शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये ६५० एस. टी. बस बंद; ५० लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:03 IST

सोमवारी रात्री संप सुरु झाल्यापासून नगर विभागातून जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी पहाटे ५.३० वाजल्यापासून सुरु होणारी ग्रामीण भागातील दैनंदिन वाहतूक पूर्णपणे बंद झाली. जिल्ह्यातील सर्व ११ आगारांमध्ये बस जागेवरच उभ्या आहेत. एकही वाहक, चालक मंगळवारी कामावर हजर झालेला नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व ११ आगारांमध्ये बस जागेवरच उभ्या आहेत.महामंडळाच्या ६५० बस जागेवरच उभ्यातारकपूर आगारात चालक, वाहकांनी निदर्शने केली पुणे, मुंबईहून गावाकडे येणा-या प्रवाशांची या संपामुळे मोठी गैरसोय

अहमदनगर : विविध मागण्यांसाठी एस. टी. महामंडळाच्या वाहक, चालकांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे एस. टी. महामंडळाच्या नगर विभागाचे तब्बल ५० लाखांचे नुकसान होणार असून, महामंडळाच्या ६५० बस जागेवरच उभ्या आहेत. दरम्यान या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.राज्यात काही ठिकाणी संपास हिंसक वळण मिळाले असताना नगरमध्ये एस. टी. कर्मचा-यांचा संप शांततेत सुरु आहे. सोमवारी रात्री संप सुरु झाल्यापासून नगर विभागातून जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी पहाटे ५.३० वाजल्यापासून सुरु होणारी ग्रामीण भागातील दैनंदिन वाहतूक पूर्णपणे बंद झाली. जिल्ह्यातील सर्व ११ आगारांमध्ये बस जागेवरच उभ्या आहेत. एकही वाहक, चालक मंगळवारी कामावर हजर झालेला नाही. केवळ एस. टी. प्रशासनाचे अधिकारी व काही कर्मचारी बसस्थानकात हजर झाले. तारकपूर आगारात चालक, वाहकांनी निदर्शने करीत आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्धार केला.दरम्यान आरटीओ, जिल्हा प्रशासन व एस. टी. महामंडळ यांनी संयुक्तरित्या प्रवाशांच्या पर्यायी व्यवस्थेसंदर्भात हालचाली सुरु केल्या असून, तातडीचा प्रवास करणा-या प्रवाशांसाठी खासगी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे़, अशी माहिती विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.

आरक्षण रद्द

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले होते, त्या प्रवाशांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांना आरक्षणाची रक्कम परत करण्यात आली आहे. संपाच्या सर्व परिस्थितीवर एस. टी. महामंडळाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. संप मागे घेण्याबाबत संघटनांशी चर्चा सुरु असल्याची माहिती एस. टी.च्या वरीष्ठ अधिका-यांनी दिली. दरम्यान दिवाळीसाठी पुणे, मुंबईहून गावाकडे येणा-या प्रवाशांची या संपामुळे मोठी गैरसोय झाली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरST Strikeएसटी संप