शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात ५ जण कोरोनाबाधित; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:15 IST

नेपाळ येथून संगमनेरला आलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले तर रात्री जामखेड येथील एका स्थानिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३८ वर पोहोचली आहे.

अहमदनगर : नेपाळ येथून संगमनेरला आलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले तर रात्री जामखेड येथील एका स्थानिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३८ वर पोहोचली आहे.संगमनेर येथील एका इमारतीतून या १४ व्यक्तींना ४ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, १४ दिवसांनंतर १० जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व व्यक्तींना संगमनेर येथे संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली़या ४ व्यक्तींचा देखरेखीखाली असण्याचा कालावधी संपणार होता. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात, १० व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह तर ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे या व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते.रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जामखेड येथील एका स्थानिकालाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. जामखेड येथील दोघा जणांना बुधवारी (दि.२२) कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील एकाच्या वडिलांचा अहवाल गुरुवारी (दि.२३) पॉझिटिव्ह आला़ त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३८ वर पोहोचली आहे़ कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २० झाली आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये ११ जण उपचार घेत आहेत. संगमनेर येथे आढळलेल्या या चार रुग्णांना नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडSangamnerसंगमनेरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस