शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

४५० जणांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: May 11, 2016 00:10 IST

श्रीरामपूर : रविवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर सोमवारी भीतीखाली असलेल्या श्रीरामपूरकरांनी मंगळवारी दडपणातून बाहेर पडत नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू केल्याने श्रीरामपूर पुन्हा सावरले.

दंगलीनंतर श्रीरामपूर सावरले : दुकानदारांच्या फिर्यादी श्रीरामपूर : रविवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर सोमवारी भीतीखाली असलेल्या श्रीरामपूरकरांनी मंगळवारी दडपणातून बाहेर पडत नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू केल्याने श्रीरामपूर पुन्हा सावरले. बाजारपेठ सुरळीत होऊन वातावरण पूर्वपदावर आले आहे. दरम्यान, दंगलीतील जाळपोळ, दगडफेक, लुटालूटप्रकरणी नुकसानग्रस्त दुकानदारांनी पोलिसात फिर्यादी देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे ४५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.प्रसाद क्रॉकरी अँड ग्लासवेअरचे मालक व राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाचे कार्यकर्ते देविदास काशीनाथ चव्हाण यांनी सोमवारी उशिरा फिर्याद दिली. त्यावरुन माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर शेख, बंटी जहागीरदार, सलीम जहागीरदार, रईस जहागीरदार, दानिश शेख, अमन शेख, तौफिक शेख, अतिक बागवान, सर्फराज पठाण, सद्दाम बांगडा, सादिक शेख, अल्तमफ पेंटर, आवेश पोपटिया, पाप्या शेख, फिरोज पोपटिया, अमजद पोपटिया, इम्रान मलिक, नवाज तांबोळी, सलमान शेख, फरदीन रफिक बागवान, शाहीद कुरेशी, सादीक शहा, आसिफ रिक्षावाला, मोहसीन शेख, अफरोज शहा, शरीफ शेख, गुलाब तजीलगणी कुरेशी, मुझबीर हारुण बागवान, अशुक लियाकत पठाण, मुन्ना कटर, झिशान फारूक शेख, शोएब सत्तार शेख, अलीम शरीफ कुरेशी, वसीम रफिक शेख, आदिल मगदूम शेख (सर्व रा. प्रभाग १, श्रीरामपूर) व इतर ३०० जणांविरुद्ध भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ४३६, ५०४, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७, आर्म अ‍ॅक्ट ४/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), (३), १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. दुसरी फिर्याद मोहसीन रफिक बागवान (वय २६, फळविक्रेते, रा. सुभेदार वस्ती) यांनी दिली. त्यावरून भाजपचे प्रकाश चित्ते, विहिंपचे विजय जैस्वाल, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, श्रीराम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये, संजय यादव, मारूती बिंगले, कुणाल कारंडे, गणेश सुरेश परदेशी, अमोल नानुस्कर (रा. सर्व श्रीरामपूर) व इतर १०० ते १५० जणांविरुद्ध भादंवि ३०७, ३९५, १४३, १४७, १४८, १४९, ४३६, ४३५, ५०४, ११४, ११७, ४२७, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.८ मे रोजी रात्री शिवाजी चौकात आरोपींनी सुदर्शन स्वीटस् दुकानासमोर गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणास जातीय स्वरुप देऊन सोबतच्या लोकांसह हातात पेटते टेंभे, पेट्रोलच्या बाटल्या घेऊन फळबाजारात येऊन दुकानांना आग लावली. सर्व दुकानांचे अंदाजे ३० लाखांचे नुकसान करून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे बागवान यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक निरीक्षक अरविंद भोळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)दंगलीमागे षड्यंत्र : विखेश्रीरामपूर : रविवारच्या श्रीरामपूरमधील दंगलीमागे नियोजनपूर्वक आखलेले षड्यंत्र असल्याचे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी रात्री येथे सांगितले.दंगलीची झळ बसलेल्या ३२ दुकानदारांना काँग्रेसच्या वतीने त्यांच्या हस्ते प्रत्येकी १० हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी नुकसानग्रस्तांची भेट घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, बाजार समितीचे सभापती नानासाहेब पवार, उपसभापती सचिन गुजर होते. विखे म्हणाले, वाहनांचा धक्का लागून झालेल्या वादानंतर लगेच इतक्या कमी वेळात जाळपोळ, लुटालूट, दगडफेक, दंगल कशी होते? दोन समाजात तेढ व दुही निर्माण करून विपरीत घडविण्याचे या दंगलीमागे नियोजित षड्यंत्र आहे. घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे. काँग्रेसच्या वतीने तत्काळ विस्थापितांना आधार देण्याचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष करण ससाणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन व मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण प्रयत्न करणार आहोत. आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले, श्रीरामपूर हे सर्व जातीधर्मियांचे गाव असून येथील नुकसानग्रस्तांना विशेष मदत मिळविण्यासाठी विखे यांनी प्रयत्न करावेत. याप्रसंगी जि. प. सभापती बाबासाहेब दिघे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, शिक्षण सभापती राजश्री सोनवणे, कांचन सानप, संगीता मंडलिक, जलीलखान पठाण, संजय फंड, अशोक व भगवान उपाध्ये, संजय छल्लारे, अ‍ॅड. विजय बनकर आदी हजर होते. करण ससाणे यांनी आभार मानले.