शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी मिळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 22:08 IST

अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने ४० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ...

अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने ४० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिले़ तसेच महामार्गाच्या मजबुतीकरण व रुंदीकरणाचा प्रस्ताव नव्याने तयार करण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी केल्या आहेत़.

माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर- मनमाड महामार्गातील खड्ड्यांचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरणाच्या सीडी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाठविल्या होत्या़ दुरुस्तीबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास कोणत्याहीक्षणी आंदोलन करण्याचा इशारा विखे यांनी दिला होता़  

या पार्श्वभूमीवर मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रालयात माजीमंत्री विखे यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाचे सचिव व प्रमुख अधिकाºयांची बैठक घेतली़  बैठकीला जिल्ह्याचे पालक सचिव नितीन करीर,रस्ते विभागाचे सचिव  देबडवार, मुख्य अभियंता पद्माकर भोसले, अधीक्षक अभियंता  जे. डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरू, उपअभियंता आऱ आऱ पाटील, अंकुश पालवे, एस. आर. वर्पे आदी उपस्थित होते़ रस्त्याची वस्तुस्थिती चव्हाण यांनी जाणून घेत निधीचा आढावा घेतला़ यावेळी माजीमंत्री विखे पाटील यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे चव्हाण यांचे लक्ष वेधले़ ते म्हणाले, नागरिकांची अडचण होत आहे़ वाहतूक तासनतास खोळंबते़ त्यामुळे अपघात होत असून, हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी आग्रही मागणी विखे यांनी यावेळी केली़ ़़महामार्गावरील ही कामे तातडीने करणार नगर- मनमाड महामार्गावरील कोल्हार आणि बाभळेश्वर  येथील पुलाचे चौपदरी करण करणे, पुणतांबा फाटा  आणि कोपरगाव येथे उड्डाणपुलाची कामे  पूर्ण करणे, रस्त्याच्या दुतर्फा साईड गटार, नागरी वस्ती असलेल्या भागात साईड पट्ट्यांचे काम पूर्ण करणे, ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत़़़़रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र संतापनगर-मनमाड महामार्गावर जागोजागी प्रचंड खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणीही साचलेले आहे. अशा स्थितीत अहमदनगर ते शिर्डीपर्यंत जाणारे नागरिक या रस्त्याच्या दुरवस्थेवर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. सध्या रस्त्यावरील खड्डे कधी बुजणार ? रस्ते दुरुस्ती कधी होणार? असे प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील