शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार शेतक-यांपैकी अवघे २६ शेतकरी होणार कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 09:42 IST

 पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी हा कर्जमुक्तीचा सोहळा आनंदाने साजरा करुन कर्जमुक्त झालेल्या शेतक-यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र पालकमंत्री राम शिंदे वाटणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आली.

अहमदनगर : जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार शेतक-यांनी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यातील अवघ्या २६ शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन त्यांची दिवाळी शासनाने गोड केली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी हा कर्जमुक्तीचा सोहळा आनंदाने साजरा करुन कर्जमुक्त झालेल्या शेतक-यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र पालकमंत्री राम शिंदे वाटणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत केलेल्या घोषणेनुसार शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीस दिवाळीपूर्वीच प्रातिनिधिक स्वरुपात अंमलबजावणी होत आहे. या योजनेचा शुभारंभ मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तर हाच कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम पालकमंत्री राम शिंदे जिल्हास्तरावर घेणार आहेत.कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची तपासणी करुन लाभार्थ्यांची यादी येणार आहे. या यादीतूनच जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी २५ जोडप्यांची निवड केली जाणार आहे. तसेच मुंबईच्या कार्यक्रमासाठी १ लाभार्थी शेतकरी किंवा एक शेतकरी जोडपे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

लाभार्थींची नावे मिळेनात

राज्य शासनाकडून पात्र लाभार्थींची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. मात्र, अद्याप ही यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळालेली नाही. त्यामुळे नक्की कोणत्या शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे, याबाबत संदिग्ध वातावरण आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मात्र या विषयावर कोणतीही भूमिका व्यक्त केली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार