शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत ३२७ कोटी रुपयांचा अपहार

By मिलिंदकुमार साळवे | Updated: April 17, 2018 13:19 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३६ हजार ७९३ प्रकरणांमधून सन २०१७-१८ पर्यंत ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची अपहार व लबाडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून ही लबाडी उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे३६ हजार ७९३ प्रकरणे

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३६ हजार ७९३ प्रकरणांमधून सन २०१७-१८ पर्यंत ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची अपहार व लबाडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून ही लबाडी उघडकीस आली आहे.राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच झाले. या अधिवेशनात वित्त विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक २०१८-१९ सादर करण्यात आले. त्यात स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयाने केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली. या संचालनालयांतर्गत राज्यभरातील ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या व २७ हजार ८५० ग्रामपंचायती, राज्यातील सर्व नागरी स्वराज्य संस्था म्हणजेच २७ महानगरपालिका, १४ महानगरपालिका शिक्षण मंडळे, ६ महानगरपालिका परिवहन उपक्रम, २३३ नगरपालिका, १२४ नगरपंचायती, ५२ नगरपालिका, ४ कृषी विद्यापीठे, १ महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व इतर २२७ संकिर्ण संस्थांचे लेखापरीक्षण करण्यात येते.२०१७-१८ च्या सुरुवातीस लबाडी व अपहाराच्या ३२ हजार २७९ प्रकरणांमध्ये २८५ कोटी ४८ लाख ५३ हजार ३०० रूपये अडकले होते. त्यात गेल्या वर्षी नव्याने ४२ कोटी ९३ लाख ९४ हजार ६९१ रूपयांच्या ४ हजार ५७१ प्रकरणांची नव्याने भर पडली. तर ८१ लाख ६ हजार ३९५ रूपयांची ५७ प्रकरणे निकाली निघाली. २०१७-१८ अखेरीस ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची ३६ हजार ७९३ प्रकरणे प्रलंबित आहेत.स्थानिक निधी लेखा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणादरम्यान नोव्हेंबर २०१७ अखेरीस अहमदनगरजिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या सुमारे ४ कोटी रुपयांच्या खर्चावर आक्षेप घेण्यात आल्याने हा खर्च वादग्रस्त ठरला आहे. यात पाथर्डी तालुका आघाडीवर आहे.

या तालुक्यातील ३० प्रकरणांमध्ये - १ कोटी २४ लाख ९८ हजार रूपयांच्या खर्चावर आक्षेप आहेत. कर्जत तालुक्यातील सर्वाधिक ८१ ग्रामपंचायतींमध्ये २७ लाख रूपये तर संगमनेरच्या ३३ ग्रामपंचायतींमधील ६५ लाख रूपयांच्या खर्चावर आक्षेप घेण्यात आले आहेत. पारनेर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींमध्ये ५० लाख ८ हजार रूपयांच्या खर्चावर लेखापरीक्षकांनी आक्षेप घेतले आहेत.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद