अहमदनगर : जिल्ह्यातील ४४ प्रादेशिक पाणी योजनांपैकी ३१ पाणी योजना चालू वर्षी अडचणीत आहे. आॅगस्ट २०१६ अखेर या ३१ पाणी योजनांची पाणीपट्टी वसुली शून्य आहे. यामुळे या पाणी योजना अडचणीत येणार आहे. दरम्यान, वीज बिलापोटी महावितरण कंपनीचे १६ कोटी ८४ रुपये थकले असून महावितरणने कारवाई केल्यास या योजनांची बत्ती गूल होणार आहे. राज्यात सर्वाधिक प्रादेशिक पाणी योजना पाणी वापर समितीच्या माध्यमातून एकट्या नगर जिल्ह्यात चालवण्यात येत आहे. मात्र, योजना चालवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाणी वापर संस्थांचे कामकाज कसे चालावे, यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतीही नियमावली दिलेली नसतांना या पाणी वापर संस्थांचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना आहेत. यात घोसपुरी, बारागाव नांदूर आणि १४ गावे वगळता अन्य गावांची स्थिती चिंताजनक आहे. या ठिकाणी पाणीपट्टी वसुलीकडे झालेले दुर्लक्ष, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून योजना तयार करतांना राहिलेल्या त्रुटींचा फटका ग्रामीण जनतेला बसत आहे. (प्रतिनिधी)
३१ प्रादेशिक योजनांची पाणीपट्टी रखडली
By admin | Updated: October 17, 2016 01:03 IST