शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

शिष्यवृत्ती प्रशिक्षणासाठी होणार ३०० विद्यार्थ्यांची निवड, १ डिसेंबरला परीक्षा; शिष्यवृत्ती निकाल वाढीसाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न

By चंद्रकांत शेळके | Updated: November 27, 2023 20:20 IST

जिल्हा परिषदेसह सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थी यात सहभाग नोंदवतात. परंतु असे असतानाही या परीक्षेचा निकाल फारच कमी लागतो.

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादी यावेत यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग विशेष प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने आता सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यातून निवडक ३०० विद्यार्थी निवडून त्यांच्यासाठी ॲानलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी म्हणून राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषदेसह सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थी यात सहभाग नोंदवतात. परंतु असे असतानाही या परीक्षेचा निकाल फारच कमी लागतो.मागील वर्षी जिल्ह्याचा पाचवीचा निकाल २६ टक्के, तर आठवीचा निकाल १६.८७ टक्के एवढाच होता. त्यामुळे या निकालात वाढ व्हावी, तसेच राज्याच्या गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जिल्ह्यात अनेकदा शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आल्या. शिवाय शालेय स्तरावर जादा तासही घेण्यात आले. त्याच धर्तीवर आता निवडक ३०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची विशेष तयारी करून घेतली जाणार आहे. पुढील वर्षीची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. त्या परीक्षेच्या दृष्टीने हे नियोजन सुरू आहे.अशी असेल विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया१ डिसेंबर २०२३ रोजी तिसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव परीक्षा ॲाफलाईन घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल त्याच दिवशी जाहीर करून जिल्हास्तरावर गुणवत्ता यादी तयारी केली जाईल. त्यात पाचवीचे १५० व आठवीचे १५० असे एकूण ३०० विद्यार्थी निवडले जातील. त्यांचे पुढे मुख्य परीक्षेपर्यंत ॲानलाईन वर्ग घेतले जातील.ॲानलाईन सत्राचे स्वरूपसर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी संधी, निवडीसाठी १ डिसेंबरला ॲाफलाईन परीक्षा, जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन, ३ डिसेंबर २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ॲानलाईन सत्राचे आयोजन, ॲानलाईन तासिकेची लिंक निवडलेल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात येईल. तासिकेची वेळ दररोज सकाळी ७ ते ८. विद्यार्थ्यांसह त्यांचे वर्गशिक्षकही सहभागी होणार.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीexamपरीक्षा