लोणी : लोणी बुद्रूक (ता.राहाता) येथील विठ्ठलनगर वसाहत परिसरात बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ५० हजार रक्कमेसह ३० तोळे सोन्या चांदिचे दागिने असा १३ लाखांचा ऐवज लांबविला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्री ही घटना घडली. जनाबाई धनसिंग ठाकूर यांनी लोणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी बुद्रूक येथील विठ्ठलनगर वसाहतीच्या जवळ असणा-या बळीनारायण रोडलगत जनाबाई राहत आहेत. त्या मूळ गावी गंगा सावखेड (जि.औरंगाबाद) येथे गेल्या होत्या. त्यांची दोन मुले आणि सुना या पुणे येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा हा बंगला बंद होता. मंगळवारी जनाबाई ठाकूर या गंगा सावखेड येथून लोणीत आल्यानंतर आपल्या बंद बंगल्याची कुलपे तोडलेल्या स्थितीत दिसली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील सोन्याची चैन, टाँप्स, गंठण, मणी आणि चांदीचे दागिने व रोख ५० हजार रक्कमेची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी अज्ञात चोरांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
लोणीत १३ लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:03 IST