अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी २८३ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, तर बरे झाल्याने ३७१ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १५१५ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान चार दिवसांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. त्यामुळे कोरोनाचा धसका अजूनही कायम असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७३ आणि अँटिजन चाचणीत १४७ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (४०), अकोले (२१), जामखेड (७), कर्जत (८), कोपरगाव (१८), नगर ग्रामीण (६), नेवासा (१७), राहाता (३३), राहुरी (७), संगमनेर (५२), शेवगाव (२१), श्रीरामपूर (१४), पारनेर (९), पाथर्डी (१६), श्रीगोंदा (१२), कन्टोन्मेंट (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.
शनिवारी घरी सोडलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ६२, अकोले २८, जामखेड ०९, कर्जत ०५, कोपरगाव २०, नगर ग्रामीण ०८, नेवासा ३२, पारनेर ३५, पाथर्डी १७, राहाता १८, राहुरी ३०, संगमनेर ५७, शेवगाव १०, श्रीगोंदा १६ श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार २१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१७ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६४ हजार ६८९ इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६२ हजार २१२ इतकी आहे.
-------------
चार दिवसांतील मृत्यू
तारीख मृत्यू एकूण मृत्यू
२ डिसेंबर ४ ९३८
३ डिसेंबर १५ ९५३
४ डिसेंबर ४ ९५७
५ डिसेंबर ५ ९६२