शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये मिळाली २८ शेतक-यांना कर्जमाफी; कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 17:03 IST

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत बुधवारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील ...

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत बुधवारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील २८ शेतक-यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम झाल्यानंतरही कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ मात्र सुरूच आहे.या शेतक-यांचे कमीत कमी ८ हजार १५४ तर जास्तीत जास्त ५६ हजार ९७९ रूपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी दोन शेतक-यांना मुख्यमंत्र्यांच्या सहीचे कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. साडीचोळी, सदरा, पायजम्याचे कापड, लाडू, शेवचिवडा देऊन शेतकरी दांपत्यांचा सन्मान करण्यात आला. खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विश्वजित माने आदी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी प्रास्ताविक केले. अहमदनगर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी आभार मानले. यावेळी आ. मुरकुटे, महापौर कदम, जिल्हाधिकारी महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

हे आहेत नगर जिल्ह्यातील २८ भाग्यवान शेतकरी

शकीला व मजनुभाई पीरमोहंमद शेख, सुमती व मधुकर पावलस जाधव (नगर तालुका), लताबाई व पाटीलबा पर्बत दिघे, सुमन व चंद्रभान मुरलीधर हासे (संगमनेर तालुका),रंजना व अण्णासाहेब मुक्ता हांडे, जयश्री व रमाजी केशू भोर (अकोले तालुका), चांगुना व मच्छिंद्र सखाराम पठारे, प्रतिभा व तुकाराम रामचंद्र अलभर (पारनेर तालुका), सुमन व पर्वती शिवराम जामले, सुनीता व संतोष तात्या खराडे (श्रीगोंदा), विठाबाई व संतराम गेणा मोरे, मंडाबाई व बाजीराव यादव सूर्यवंशी (कर्जत), अलका व दत्तात्रय मुरलीधर शेळके, सुवर्णा व धर्मा बाजीराव लेकुरवाळे (जामखेड), मातराबाई व धोंडीराम बन्सी पालवे, पद्मा व पोपट धोंडीबा कारखिले (पाथर्डी), लताबाई व राम भानुदास सोलाट, सुमन व अंबादास हरिभाऊ चेडे (शेवगाव), विमल व नामदेव निकम, राजसबाई व प्रकाश दिनकर करपे (नेवासा), मीरा व उल्हास भाऊसाहेब भवर, छाया व रवींद्र श्रीराम लगे (राहुरी), मिनाबाई व प्रभाकर दशरथ पेरणे, सुनीता व भीमराज राधाकिसन दौंड (श्रीरामपूर), संगीता व दिलीप मोहन कापसे, कमल व जालिंदर सजन वाणी (राहाता), विजया व सुरेश काशीनाथ लांडगे, जिजाबाई व त्रिंबक गोपाळ रणशूर (कोपरगाव).

कर्जमाफीसाठी राज्य सरकारने १३ हजार ८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जिल्ह्याची अंतिम मंजूर (ग्रिन लिस्ट) यादी लवकरच प्रसिद्ध होईल. जिल्ह्यातील ३ लाख ७६ हजार लाभार्थी पात्र ठरले आहेत. सरकारने शब्द पाळून विरोधकांच्या टीका टिपण्णीस कृतीतून उत्तर देत त्यांचे तोंड बंद केले आहे.प्रा. राम शिंदे, पालकमंत्री, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार