श्रीगोंदा (जि. अहमदनगर) राजापुर शिवारात एका सुडीत दोन नाग घुसले नाग मारण्यासाठी सुडी पेटविली आणि या आगीत शेजारी असलेला २० लाख किंमतीचा दहा एकर जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
राजापुर येथील एका शेतकऱ्याच्या बाजरीच्या सुडीत दोन नाग घुसले. हे नाग मारण्यासाठी काहींनी सुडी पेटवून देण्याची शक्कल लढवली. सुडी पेटविली आणि आगीचा लोळ थेट ऊसात पोहचला. या आगीत ज्ञानेश्वर धावडे व विष्णू गुंजाळ यांचा दहा एकर ऊस जळून भस्मसात झाला. शंकरराव पाडले यांनी या घटनेची माहिती कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांना दिली. राहुल जगताप यांनी शनिवार पासून ऊस तोडणी करावी, अशा सुचना कुकडी कारखान्याचे शेतकी विभागास दिल्या.