अहमदनगर : राज्यातील महापारेषणमधील जिल्हा सुरक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या कामगारांना मूळ वेतनाच्या २० टक्के विशेष पूरक भत्ता लागू करण्याच्या सूचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील साडेतीन हजार कामगारांना विशेष पूरक भत्ता लागू होईल, अशी माहिती स्वाभिमानी सुरक्षा कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर मुरकुटे यांनी दिली.
वीज महापारेषण कंपनीत कंत्राटी कामगारांना मूळ वेतनाच्या २० टक्के विशेष पूरक भत्ता देण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक कामगार संघटनेकडून पाठपुरावा करण्यात आला. महापारेषणच्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले होते. परंतु, परिपत्रकाची अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळे संघटनेने राज्यमंत्री तनपुरे यांची मंत्रालयात भेट घेऊन लक्ष वेधले. मंत्री तनपुरे यांनी ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांना सुरक्षा कामगारांना २० टक्के विशेष पूरक भत्ता देण्याबाबतच्या परिपत्रकाची अंमलबजाणी करण्याची सूचना केली. सदर परिपत्रकाची अंमलबजावणी केल्यास राज्यातील ३ हजार ६०० कामगारांचा पगार वाढणार आहे.
...
सूचना फोटो ९ तनपुरे नावाने आहे.