शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा क्षेत्रातील जामखेडचा ४८ वर्षीय ‘आयर्नमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 14:45 IST

पणजी (गोवा) येथील  ‘आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ७०.३’ (धावणे, पोहणे, सायकलिंग) या स्पर्धेत जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी जेतेपद पटकाविले.

अशोक निमोणकर । 

जामखेड : पणजी (गोवा) येथील  ‘आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ७०.३’ (धावणे, पोहणे, सायकलिंग) या स्पर्धेत जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी जेतेपद पटकाविले. यासह दोन वर्षात त्यांनी अनेक धावण्याच्या स्पर्धेत जेतेपद पटकाविली आहेत. ते आता जामखेडचे ‘आयर्नमॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.डॉ. सानप जामखेड येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. ते मूळचे सौताडा (ता. पाटोदा, जि. बीड) येथील रहिवासी आहेत. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या खुल्या जागेत ते दररोज सकाळी धावण्याचा सराव करतात. येथील भुतवडा तलाव, सौताडा तलाव या सहा किमी अंतरावर सायकलने जाऊन ते पोहोण्याचा सराव करतात. या गोष्टींचा नित्यक्रम ते चुकवू देत नाहीत. त्यामुळे त्यांनी वयाच्या ४८ व्या वर्षीही धावण्याच्या स्पर्धेतील अनेक पदके जिंकली आहेत.डॉ. सानप यांनी गोवा राज्यातील पणजी येथील आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन ७०.३ स्पर्धेत २० आॅक्टोबर २०१९ रोजी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जगातील २७ देशातील स्पर्धेक सहभागी झाले होते. राज्यातील ६० जणांनी यामध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेत १.९ किलोमीटर जलतरण, ९० किलोमीटर सायकल चालवणे, २१ किलो मीटर धावणे हे सर्व लक्ष्य न थांबता ८ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करायचे होते. डॉ. सानप यांनी हे लक्ष्य ७ तास २९ मिनिटांमध्ये निश्चित वेळेआधी एक तास पूर्ण केले. ट्रायथलॉन १.५ किलोमीटर जलतरण, ४० किलोमीटर सायकलिंग व १० किलो मीटर धावणे या स्पर्धेत त्यांनी अव्वल क्रमांक पटकाविला. औरंगाबाद, सातारा, नगर, पुणे व मुंबई येथील हाफ मॅरेथॉन (२१ किमी) मॅरेथॉन (४२ किमी), अल्ट्रामॅरेथॉन (५०/६० किमी) अशा अनेक स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. त्यात जेतेपदे पटकाविली आहेत. ९ सप्टेंबर २०१८ ला जम्मू काश्मीर राज्यातील लढाख येथे हाफ मॅरेथॉन स्पर्धा ११ हजार फूट उंचीवर आॅक्सिजनची कमतरता असतानाही त्यांनी पूर्ण केली होती. त्याबद्दल त्यांना पदक मिळाले होते.जीवनात सर्वाधिक महत्त्व उत्तम आरोग्याला द्यायला हवे. शारीरिक तंदुरुस्ती हीच खरी धनसंपदा आहे. व्यायामाच्या आवडीतून सराव करत होतो. त्यातूनच आत्मविश्वास निर्माण झाला आणि विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागलो, असे  विजेते डॉ. पांडुरंग सानप यांनी सांगितले.

टॅग्स :JamkhedजामखेडKhelo India 2019खेलो इंडिया 2019