शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

१ आॅगस्टला जामखेड, शेवगावच्या नगराध्यक्षांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 14:07 IST

जामखेड व शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कालावधी ८ आॅगस्टला संपत आहे.

जामखेड : जामखेडशेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कालावधी ८ आॅगस्टला संपत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या दोनही नगरपरिषद नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रम जाहीर केला असून १ आॅगस्टला निवड होणार आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी (दि. २७ जुलै) रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड एक आॅगस्टला रोजी होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. २७ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. व त्याच दिवशी छाननी होऊन वैध उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.नामनिर्देशन पत्र छाननीत फेटाळले तर अपील दाखल करण्याची मुदत (दि. ३० जुलै) सोमवार सकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी सायंकाळी अध्यक्ष पदासाठी वैधरित्या नामनिर्देशन सदस्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ आॅगस्ट रोजी आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी १ आॅगस्ट रोजी १० ते १२ या कालावधीत नामनिर्देशन पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करावे. नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवड करण्यात येणार आहे.जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. याकरिता गटनेत्या विद्या वाव्हळ व निखिल घायतडक हे दोघे पदाचे दावेदार आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी होण्याची शक्यता असून याकरिता १५ नगरसेवक इच्छुक आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडShevgaonशेवगाव