शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

ओढ्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ओएसआर फाउंडेशनच्या १८ जणांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 15:57 IST

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ओढ्यावर शेततळे व नांगरट करून अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत अनेकदा निवेदने देवूनही अतिक्रमण काढले जात नसल्याचे ओएसआर फाउंडेशनचे म्हणणे आहे. त्यामुळे या फाउंडेशनच्या १८ सदस्यांनी शुक्रवारी  महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून संगमनेर प्रांतकचेरीबाहेर  बेमूदत उपोषण सुरू केले आहे.

संगमनेर : तालुक्यातील साकूर येथील ओढ्यावर शेततळे व नांगरट करून अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत अनेकदा निवेदने देवूनही अतिक्रमण काढले जात नसल्याचे ओएसआर फाउंडेशनचे म्हणणे आहे. त्यामुळे या फाउंडेशनच्या १८ सदस्यांनी शुक्रवारी  महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून संगमनेर प्रांतकचेरीबाहेर  बेमूदत उपोषण सुरू केले आहे.

     साकूर येथील गट क्रमांक ४६७/२ पैकी साकूर-संगमनेर रस्त्यालगत पूर्वेकडील ८३ गुंठे जागा ही ओएसआर फाउंडेशनच्या मालकीची आहे. सदर जागेवर परवानगी घेऊन बांधकाम सुरू आहे. या जागेच्या पूर्वेला साधारण १०० फूट व उत्तरेला ६० फ,ूट नैसर्गिक ओढा आहे. परंतू ओढ्याशेजारील शेतमालकाने अतिक्रमण करून शेततळे व शेतजमीन तयार केल्याने या ओढ्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. ओढा बुजल्याने पुराचे पाणी हे आमच्या बांधकाम क्षेत्रात घुसते. या बाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील कार्यालय व साकूर ग्रामपंचायतीला निवेदने देवून अतिक्रमण काढण्याची कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे २ आॅक्टोबरपासून उपोषण सुरू केल्याचे फाउंडेशनने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

रामदास खेमनर, योगेश फिरोदिया, दीपक हजारे, धीरज तिरवाडी, दीपक वखारिया, अनिल मैड, मिथुन केदारी, प्रशांत शेलार, अविनाश रासने, श्रीराम कल्याणकर, बाळासाहेब खेमनर, अरूण गोफणे, संतोष गोफणे, उमेश काजळे, उमेश वखारिया, नितीन लोळगे, किशोर कोळपकर, संतोष पंधारे हे  फाउंडेशनचे १८ सदस्य उपोषणाला बसले आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरStrikeसंप