शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
2
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
3
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
4
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
5
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
6
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
7
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
8
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
10
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
11
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
12
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
13
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
14
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
15
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
16
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
17
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
18
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
19
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
20
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली

संतापजनक! अपहरण करत नगरमधील १६ वर्षीय मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, ७ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:19 IST

काही आरोपी नशेत होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

अहिल्यानगर : अकरावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करत त्याला मारहाण करण्यात आली व निर्जनस्थळी नेत तीन ते चार जणांनी त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी रात्री अहिल्यानगर शहराजवळील केडगाव उपनगरात नेप्ती बाजार समितीशेजारी ही घटना घडली.

याप्रकरणी बाराजणांविरोधात गुरुवारी रात्री कोतवाली पोलिस स्टेशनला बाललैंगिक अत्याचारासह (पोस्को) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून पाचजणांना शोध सुरू आहे. मयूर अनिल आगे, शाहरुख अन्सार पठाण, ओमकार ऊर्फ भय्या राहिंज, रोहित पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते (सर्व रा. केडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय एक अल्पवयीन आरोपीही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मिरवणूक निघाली हाती. मिरवणूक संपल्यानंतर फिर्यादी मित्राच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तिथे चारचाकीतून एक टोळके आले. त्यांनी घरात घुसून फिर्यादीला व त्याच्या मित्राला बाहेर काढले. रस्त्यावर मारहाण करत त्यांना बळजबरीने चारचाकीत बसविले. त्यांना नेप्ती बाजार समिती शेजारच्या मोकळ्या जागेत नेण्यात आले. काही वेळानंतर तेथे मोटारसायकलवरून आणखी काहीजण आले. त्यातील एकाने फिर्यादी व त्याच्या मित्राला आम्हीच ओंकार राहिंज यांची टपरी फोडली असून, मित्राच्या घरी लपून बसलो होतो, असे बोलायला सांगून त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर यातील मयूर आगे याने फिर्यादीला कपडे काढायला सांगितले. त्यास विरोध केल्याने ओमकार राहिंज याने फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने घाबरून कापडे काढले. तीन ते चारजणांनी फिर्यादीवर अनैसर्गिक अत्याचार केला.

रावण साम्राज्य-शिवशंभो ग्रुपमध्ये होता वादआरोपींचा रावण साम्राज्य नावाचा ग्रुप आहे. मयूर आगे हा या ग्रुपचा अध्यक्ष आहे. त्यांच्याविरोधकांचा शिवशंभो ग्रुप आहे. रावण साम्राज्य ग्रुपच्या राहिंज याची काही दिवसांपूर्वी टपरी फोडण्यात आली होती. तेव्हापासून दोन टोळ्यांमधील वाद आणखी तीव्र झाले होते. फिर्यादी हा त्या ग्रुपच्या मुलांसोबत राहतो, याचा आरोपींना राग होता. या रागातूनच त्यांनी फिर्यादीला उचलून नेऊन अत्याचार केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आरोपींनी केली होती नशामित्राची टपरी फोडल्याच्या रागातून १२ जणांच्या टोळीने फिर्यादी व त्याच्या मित्राचे अपहरण केले. मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी फिर्यादीला निर्जनस्थळी नेले. काही आरोपी नशेत होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मित्राच्या घरून फिर्यादीला उचलले तेव्हा मित्राच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली.

'तो' मृत झाल्याचे समजून सोडून निघून गेलेआरोपींनी अत्याचार करताना मोबाईलमध्ये व्हिडीओ काढले. त्यानंतर फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. मात्र, फिर्यादीने तो चुकविला. त्यामुळे आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या पंचाने फिर्यादीचा गळा दाबला. त्यात तो मयत झाल्याचा आरोपींचा समज झाला. सर्व आरोपी तेथून निघून गेले. फिर्यादी बुधवारी सकाळी सहा वाजता शुद्धीवर आला. तो सकाळीच घरी आला. भीतीमुळे त्याने घरी सांगितले नाही. तुझा डोळा का सुजला? असे आईने विचारले असता त्याने प्रकार आईला सांगितला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे फिर्याद दोन दिवसांनंतर दाखल झाली.

मित्राची स्कॉर्पिओआरोपीतील एकाच्या नातेवाइकाचा दशक्रिया विधी होता. त्यासाठी स्कॉर्पिओ आलेली होती. खोटी माहिती घेऊन आरोपींनी स्कॉर्पिओ घेतली. ती घेऊन काहीजण फिर्यादीच्या घरी गेले. फिर्यादीला उचलले व निर्जनस्थळी नेले. काही आरोपी दुचाकीवर होते.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ