शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
9
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
10
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
11
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
12
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
13
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
14
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
15
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
16
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
17
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
18
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
19
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
20
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप

भंडारदऱ्यात अवघा १४९ दलघफू साठा

By admin | Updated: May 31, 2016 23:08 IST

राजूर/अकोले : भंडारदरा-निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आल्यानंतर भंडारदरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा १४९ दलघफू इतका राहिला आहे.

राजूर/अकोले : भंडारदरा-निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आल्यानंतर भंडारदरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा १४९ दलघफू इतका राहिला आहे.उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, नेवासा आणि राहुरी या सहा तालुक्यांना वरदान ठरलेले भंडारदरा धरण यावर्षीही तुडुंब भरले होते. सिंचनाबरोबरच पिण्यासाठी वेळोवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस या धरणातील एकूण पाणीसाठा ४४९ दलघफूटावर स्थिरावला. यातील ३०० दलघफू पाणी हा मृतसाठा आहे. त्यामुळे या धरणात यावेळी फक्त १४९ दलघफू उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे.गतवर्षी यावेळी या धरणात १ हजार १९९ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. धरणातून ७२० क्युसेक्सने पाणीही सोडण्यात येत होते. मागील वर्षीचाच विचार करता ७ जूनपासून धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली होती. यावर्षी धरणाच्या पाणलोटात अवकाळी पाऊसही बरसला नाही.निळवंडे धरणात यावेळी एकूण ४४६ दलघफू पाणी शिल्लक आहे. यातील १३५ दलघफू मृतसाठा आहे. म्हणजेच या धरणातही केवळ ३११ दलघफू उपयुक्त पाणी शिल्लक आहे. प्रवरेवरील दोन्ही धरणे मिळून ४६० दलघफू पाणी आजमितीस शिल्लक असून, उन्हाची तीव्रताही वाढतच असल्यामुळे आवर्तन बंद झाल्यानंतर पाच सहा दिवसात प्रवराकाठ कोरडा होत असतो. पाऊस लांबल्यास शिल्लक पाणीसाठ्यातून पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागास कसरत करावी लागणार, हे निश्चित. (वार्ताहर)