शहरं
Join us  
Trending Stories
1
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
2
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
3
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
4
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
5
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
6
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
7
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
8
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
9
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
10
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
11
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
12
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
13
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
15
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
17
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
18
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
19
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
20
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात १४३७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत; जि.प.ची जागा नसल्याने अडचण

By चंद्रकांत शेळके | Updated: June 21, 2023 19:23 IST

अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधांची वानवा आहे.

अहमदनगर : ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १४३७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत, समाजमंदिर किंवा ग्रामपंचायतीच्या खोल्यांत भरत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या बालकांच्या मनावर प्रारंभीच असुविधांचा शिक्का बसत आहे. अनेक अडचणींवर मात करत ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू आहेत. जिल्ह्यातील २७ टक्के अंगणवाड्यांना स्वत:ची इमारती नसल्याने ते इतरत्र भरत आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधांची वानवा आहे.

नगर जिल्ह्यात सुमारे ५ हजार ३७५ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ४७७ अंगणवाड्या भाडोत्री जागेत, १७९ अंगणवाड्या समाजमंदिरात, २९८ अंगणवाड्या प्राथमिक शाळेत, तर ८७ अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या जागेत भरतात. अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या खेळण्यांचीही परवड सुरू आहे. समाजमंदिरे किंवा अन्य ठिकाणी भरणाऱ्या अंगणवाड्यांत मुलांचे साहित्य ठेवायचे कुठे हा प्रश्न असतो. काही ठिकाणी साहित्य सुरक्षित ठेवण्याची सोय नसल्याने विद्यार्थी खेळणी घरी नेतात तर काही ठिकाणी समाजमंदिरातच ठेवली जातात. नंतर मात्र खेळणी चोरीस जातात. १९८४ अंगणवाड्यांत नाही नळ कनेक्शनजिल्ह्यातील ५३७५पैकी १९८४ अंगणवाड्यांमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन नाही. तसेच १५४७ ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नाही. अनेक ठिकाणी सेविकांना बाहेरून पाणी आणावे लागते किंवा बालकांचे पालक घरूनच पाण्याची बाटली देतात. ग्रामपंचायतींकडून तेथे नळ कनेक्शन दिले गेलेले नाही. तसेच स्वच्छतागृहाची सोय नसल्याने बालकांना उघड्यावर जावे लागते.

  • जिल्ह्यातील अंगणवाड्या - ५३७५
  • स्वतःची इमारत असलेल्या - ३९३८
  • स्वतःची इमारत नसलेल्या - १४३७
  • कार्यरत अंगणवाडी सेविका - ४५९५
  • कार्यरत मिनी सेविका - ८१६
  • अंगणवाडी मदतनीस - ४१४२

 या कारणामुळे नाही स्वतःची इमारतज्या १४३७ ठिकाणी अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही त्याचे प्रमुख कारण त्या गावात जिल्हा परिषदेची जागा शिल्लक नसणे हे आहे. जि.प. कडे जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे तेवढी आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे या अंगणवाड्या इतरत्र भराव्या लागतात. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा