श्रीगोंदा : वि.वि. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेच्यावतीने १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बेलवंडी येथे १२ वे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब शेलार, अशोक शर्मा यांनी दिली.संमेलनाचे उद्घाटन डॉ.सुधा कांकरिया यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थान ज्येष्ठ कथाकार देवदत्त हुसळे भूषवतील.संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बबनराव पाचपुते, राहुल जगताप, अनुराधा नागवडे, घन:श्याम शेलार, सुवर्णा पाचपुते, गणेश शिंदे, शरद गोरे, अॅड.संभाजीराव बोरूडे हजर रहातील. या संमेलनात डॉ. कांकरिया यांच्या ‘प्रिय गोडुली’ या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बेलवंडीत बारावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
By admin | Updated: July 17, 2014 00:28 IST