शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

वेश्या व्यवसाय चालविणा-यांचा पोलिस पथकावर हल्ला : पाच महिलांसह ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:16 IST

वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिस पथकावर आरोपींनी दगडाने हल्ला करत त्यांना जखमी केले़

अहमदनगर : वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिस पथकावर आरोपींनी दगडाने हल्ला करत त्यांना जखमी केले़ नगर-औरंगाबाद रोडवरील पांढरीपूल येथे हॉटेल जय मल्हार येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली़या मारहाणीत पोलिस कॉस्टेबल सिद्धार्थ घुसळे व अक्षयकुमार वडते हे जखमी झाले आहेत़ पोलिसांनी घटनास्थळावरून पाच महिलांसह अकरा जणांना अटक केली आहे़ पांढरीपूल येथील हॉटेल जयमल्हार येथील पत्र्याच्या शेडमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक मनिषक कलवानिया यांना मिळाली होती़ माहितीनुसार या ठिकाणी शुक्रवारी दुपारी पोलिस हेड कॉस्टेबल सय्यद, सहाय्यक फौजदार निसार शेख, अरकल, पोलिस नाईक करांडे, नाकाडे, गणेश धुमाळ, आव्हाड, जाधव, एऩपी गोडे, यु़ए़ राठोड, एऩए़ भुजबळ, बिरुटे, सिद्धार्थ घुसळे, अक्षयकुमार वडते, आऱआऱ ठोंबे हे पथक कारवाईस गेले होते़ घटनास्थळी पोलिसांना पाच महिला व सहा पुरुष मिळून आले़ यावेळी पोलिस आरोपींना ताब्यात घेत असताना वेश्या व्यवसाय चालविणारे गंगाराम जानकू काळे व रशिद सरदार शेख हे तेथून पळून जाऊ लागले़ त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा काळे याने हेड कॉस्टेबल घुसळे यांच्या डोक्यात दगड मारला तर रशिद याने पोलिस हेड कॉस्टेबल वडते यांना लाथाबुक्याने मारहाण केली़ या मारहाणीत दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत़पोलिसांनी पळणाऱ्या गंगाराम काळे, रशिद शेख यांच्यासह अन्सार गफूर शेख(राख़ोसपुरी ता़ नगर), वाजिद नसीर शेख (वय ३९ रा़सावता नगर ता़ नगर), मन्सूर रहमानभाई पठाण (वय ४२ रा़ मिरी ता़ पाथर्डी), बाबा निजाम शेख (वय ४६रा़ खोसपुरी) यांच्यासह पाच महिलांना ताब्यात घेतले आहे़ याप्रकरणी आरोपींविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पांढरीपुल परिसरात अवैध व्यवसायिकांचा सुळसुळाटनगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपूल येथे जुगार क्लब, मटका व वेश्या व्यवसाय असे विविध स्वरुपांचे अवैध व्यवसाय सुरू आहेत़ रस्त्यात अडवून प्रवाशांना लुटण्याच्याही घटना या परिसरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत़ येथील अवैध व्यवसायांमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस