अहमदनगर : येथील साई एंजल्स स्कूल प्रांगणात १०१ वृक्षांची लागवड करून शहरात ३५० झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प शाळा व्यवस्थापनाने शुक्रवारी केला़लोकमतच्या वतीने सुरू करण्यात आलेला माय सिटी माय ट्री उपक्रम येथील साई एजल्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये राबविण्यात आला़ संस्थेच्या खजिनदार सायली करपे यांच्या हस्ते झाडे लावून प्रारंभ करण्यात आला़ संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव करपे, लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, प्राचार्या सुवर्णलता कदम, लोकमतचे सहाय्यक जाहिरात व्यवस्थापक सुरज धाये, प्रशासन विभाग प्रमुख निलेश घोलप, शिक्षक नवाज पठाण, क्षितीजा हडप, सोनी पांडे, वृषाली कुलकर्णी, विद्या मालपुरे, संदीप रहाणे, सारिका बेरड आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते़ शाळेच्या प्रांगणात यावेळी वड, पिंपळ, आंबा, यासारखी १०१ झाडे लावण्यात आली़ त्याचबरोबर घर व परिसरात प्रत्येकी एक झाड लावण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला़ शहरासह उपनगरांत कमीत कमी ३५० झाडे लावण्यात येणार आहेत़ त्याचबरोबर झाडांचे संगोपन करण्यात येणार असून, ही झाडे जगविण्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी करपे यांनी सांगितले़
साई एंजल्स स्कूलमध्ये १०१ झाडांची लागवड
By admin | Updated: July 8, 2016 23:34 IST