कला शाखेतील विद्यार्थिनी गायत्री मंचरे हिने ८५. ६६ टक्के गुण मिळवीत प्रथम येण्याचा मान मिळवला. कावेरी पवार हिने ७४. ८३ टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक तर दीपक सोनवणे याने ७२. ६६ टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विज्ञान शाखेत दिव्या सोनवणे हिने ९४. ३३ टक्के गुण मिळवीत प्रथम येण्याचा मान मिळविला. ऐश्वर्या ठोंबरे हिने ९१.८३ टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक तर नितीन लक्ष्मण ठोंबरे याने ८९. ३३ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. वाणिज्य शाखेत वैष्णवी शेटे हिने ८७.३३ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर गायत्री अनिल आबक हिने ८२. ३३ टक्के गुण मिळवीत द्वितीय तर मोना संतोष चव्हाण हिने ८०. ०५ टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या यशाबद्दल माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजेश परजणे, खासदार डॉ. सुजय विखे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. हरिभाऊ आहेर, महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी सुनीता कदम, प्राचार्य युवराज सदाफळ यांनी कौतुक केले.