शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड तालुक्यातील रस्त्यांना 10 कोटींच्या निधी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:33 IST

तालुक्यातील रस्त्यांच्या नुतनीकरण कामांसाठी सुमारे 9 कोटी 75 लक्ष रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याने या भागातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हळगाव : पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून सन  2019 - 20 च्या  अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार हळगाव परिसरासह तालुक्यातील रस्त्यांच्या नुतनीकरण कामांसाठी सुमारे 9 कोटी 75 लक्ष रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याने या भागातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हळगाव परिसरातील  प्रजिमा 105 या मार्गावरील  फक्राबाद ते कुसडगाव या रस्त्याच्या दीड किलोमीटर भागात मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 50 लाख रुपये, प्रजिमा 104 या मार्गावरील पिंपरखेड ते मलठण या रस्त्यावरील दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 75 लाख रुपये , राज्यमार्ग 56 वरील सीना नदी ते वाळूंजकरवस्ती या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी दीड कोटी रुपये, तसेच प्रजिमा 72 या मार्गावरील राजुरी ते पिंपळगाव आळवा व पिंपळगाव आळवा ते आपटी या साडेपाच किलोमीटर अंतराच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी दोन कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. प्रजिमा 69 या मार्गावरील वाघाफाटा ते मोरेवस्ती व जवळके फाटा ते सटवाई मंदिर या परिसरातील दोन किलोमीटर मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी दीड कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत.  राज्यमार्ग 56 वरील बीड रस्ता ते साकत या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी  साडेतीन कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड