शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 22, आपल्या गुणांबद्दलही आपल्याला अज्ञान असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 12:53 IST

माझ्या जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी मी हा धर्म सोडून दुस-या धर्मात जाईन म्हणशील तरी प्रश्न काही सुटणार नाहीत. नुसते पोशाख बदलले म्हणून प्रश्न सुटतो का? किती ते पोशाख बदललेस तरी तू आहेस तसाच आहेस म्हणून धर्म बदलून तुझे प्रश्न सुटणार नाहीत.

ठळक मुद्देसगळ्या गोष्टींचे आपल्याकडे अज्ञान आहे आणि असे असूनही आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालेले आहोत.जीवनविद्या म्हणूनच सांगते तू मूळाकडे जा. खंरतर मूळ काय आहे याचे अज्ञान आहे.निंदकाचे घर असावे शेजारी. कारण तो तुम्हांला तुमचे दोष बरोबर दाखवतो.

- सदगुरू श्री वामनराव पैमाझ्या जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी मी हा धर्म सोडून दुस-या धर्मात जाईन म्हणशील तरी प्रश्न काही सुटणार नाहीत. नुसते पोशाख बदलले म्हणून प्रश्न सुटतो का? किती ते पोशाख बदललेस तरी तू आहेस तसाच आहेस म्हणून धर्म बदलून तुझे प्रश्न सुटणार नाहीत. तू अज्ञानी राहिलास तर प्रश्न कसे सुटणार. जीवनविद्या काय सांगते तू प्रश्नाच्या मुळाकडे जा.मुळाकडे गेलास की तुला कळेल की तिथे अज्ञान आहे.आपल्याला सगळ्याच गोष्टींचे अज्ञान आहे.विचार कसा करावा याचे अज्ञान आहे. बोलावे कसे याचे अज्ञान आहे.इच्छा आकांक्षा काय कराव्यात याचे अज्ञान आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचे आपल्याकडे अज्ञान आहे आणि असे असूनही आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालेले आहोत. एखादया मनुष्याने आपल्या पोटाला धोंडा बांधलेला आहे व नदीत उतरला तर त्याचे काय होणार तर तो बुडणार अगदी तसेच आपण अज्ञानाचा धोंडा पोटाला बांधून भवनदीत उतरलेले आहोत तर मग आपले काय होणार असे असेल तर आपण बुडणार. जीवनविद्या म्हणूनच सांगते तू मूळाकडे जा. खंरतर मूळ काय आहे याचे अज्ञान आहे. त्यामुळे आपल्याला सर्वच गोष्टींचे अज्ञान आहे. आपल्याला मी कोण याचे अज्ञान आहे ते तर जाऊ दयाच पण आपले गुणदोष काय हे देखील आपल्याला माहित नसतात.आपल्या दोषांबद्दल आपण अज्ञानी आहोत पण आपल्या गुणांबद्दलही आपल्याकडे अज्ञान असते.आपल्यात काय काय गुण आहेत हे देखील अनेकांना माहित नसते.म्हणजे असतो गुणी पण गुणांबद्दलही अज्ञान असल्यामुळे कधीकधी असे गुण अचानक उद्भवतात.उदा.आता मी प्रवचन करतो पण शाळा कॉलेजमध्ये असताना मी कधी साधे बोललो देखील नाही.वक्तृत्व स्पर्धेत कधीच भाग घेतला नाही .कुठल्या संस्थेत जाऊन कधी मार्गदर्शन केले नाही. किंवा मी कधी लिखाण देखील केले नव्हते. पण एका प्रसंगातून माझ्या आयुष्यात प्रवचनाला सुरवात झाली. काही लोकांनी आग्रह केला की तुम्ही लिहिलेच पाहिजे म्हणून माझ्या लिखाणाला सुरवात झाली. माझी पुस्तके प्रकाशित झाली. आत्तापर्यंत अनेक प्रवचने झाली पण हे गुण देखील माझ्याकडे आहेत हे मला पूर्वी माहीत नव्हते. तसेच आपल्याकडे असलेले गुण आपल्याला माहित नसतात आणि दोषांबद्दल तर काही विचारायलाच नको. आपले दोष आपल्याला समजत नाहीत व दुस-यांनी ते दाखविलेले आपल्याला आवडत नाहीत.संत काय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. कारण तो तुम्हांला तुमचे दोष बरोबर दाखवतो. खंरतर त्याबद्दल तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत व आपण स्वत:मध्ये सुधारणा केली पाहिजे.पण वास्तविक दोष दाखविल्यावर रागवणारे लोकच जास्त प्रमाणात आढळतात. जीवनविद्या सांगते तुझ्याकडे अज्ञान किती आहे ते बघ. तुझ्याजवळ अज्ञानाचा धोंडा आहे व तू तो बांधूनच अज्ञानाच्या समुद्रात उडी घेत आहेस. त्यामुळे हे अज्ञान दूर झाले पाहिजे व त्याठिकाणी ज्ञान आले पाहिजे. आता हे ज्ञान तुला कोण देणार. शिक्षक प्राध्यापक गुरू सदगुरु गाईड मार्गदर्शक तुला हे ज्ञान देणार. तू स्वयंभू ज्ञानी आहेस का नाही मग हे ज्ञान कुणाकडून घेण्याशिवाय तुला तरणोपाय नाही.