शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २५, हे विश्व आपले घर आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 07:00 IST

हे विश्व आपले घर आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत. आपण सर्व बंधू आहोत ही संकल्पना जर जगात राबवली गेली तर जगात सुखच सुख असेल. कुठेही दु:ख निर्माणच होणार नाही.पण आज जगात नेमके उलटे चाललेले आहे

ठळक मुद्देतर प्राण्यांमध्ये युध्द लढाया झालेल्या आपण कधी ऐकल्या नाहीत.आता जर युध्द झाले तर मी जिंकलो असे सांगायला सुध्दा कुणी उरणार नाही.भस्मासुराने स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवला व त्यामुळे त्याचे भस्म झाले. ही कथा जी आहे ती मोठी मार्मिक आहे.

- सदगुरू श्री वामनराव पैहे विश्व आपले घर आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत. आपण सर्व बंधू आहोत ही संकल्पना जर जगात राबवली गेली तर जगात सुखच सुख असेल. कुठेही दु:ख निर्माणच होणार नाही.पण आज जगात नेमके उलटे चाललेले आहे. कुणी कुणाला विचारत नाही, कुणाचा पायपोस कुणात नाही, एकमेकांचा द्वेष करतात, एकमेकांचा तिरस्कार करतात, एकमेकांशी भांडतात, युध्द लढाया करतात व हे कोण करतो तर ज्या माणसाकडे बुध्दी आहे तोच हे करत असतो. इतर प्राण्यांमध्ये तुम्हाला या गोष्टी कधीच दिसणार नाहीत. इतर प्राण्यांमध्ये युध्द लढाया झालेल्या आपण कधी ऐकल्या नाहीत. दोन कुत्रे एकमेकांशी झगडतील पण एक बाजूला एका कुत्र्याची फौज व दुस-या बाजूला दुस-या कुत्र्याची फौज असे कधी होत नाही. माणसे मात्र आपला ग्रुप करतात आपली फौज तयार करतात व एकमेकांविरूध्द लढतात, संहार करतात. दुस-या महायुध्दापर्यंत किती लोक मारले गेले, किती मुले बेवारस झाली, किती बायका विधवा झाल्या आणि आता जर पुन्हा युध्द झाले तर सर्वच संपेल. आता जर युध्द झाले तर मी जिंकलो असे सांगायला सुध्दा कुणी उरणार नाही. याला कारण माणसाची बुध्दी माणसाच्या बुध्दीने जितकी प्रगती साधलेली आहे तितकीच तीने स्वत:च्या विनाशाची सुध्दा तयारी करून ठेवलेली आहे. आपल्या पुराणात एक सुंदर कथा आहे ती म्हणजे भस्मासुराची. भस्मासुराला भगवान शंकराने वर दिला. आपल्याला माहित आहे भगवान शंकर हा भोळा शंकर आहे. त्याच्याकडे जे मागावे त्याला तो तथास्तु म्हणतो.भस्मासुराने भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकराने त्याला प्रसन्न होऊन वर मागायला सांगितले. त्यावर याने काय मागितले तर मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म झाले पाहिजे. म्हणजे बघा लोक काय मागतात. माणसाची बुध्दी ही अशी आहे. लोकांचे कल्याण होणारे काहितरी मागावे, लोकांचे भले होण्यासाठी काहीतरी मागावे ही बुध्दीच कोणाकडे नाही व तरीही स्वत:ला माणूस बुध्दीमान समजत असतो. असो या वरामुळे भस्मासुराने ज्याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करायला सुरवात केली. यामुळे त्याला जे जे नको होते त्यांचे भस्म झाले. शेवटी त्याने विचार केला की आपण शंकराच्या डोक्यावर हात ठेवूया म्हणजे आपल्याला पार्वती मिळेल. त्यामुळे शंकर धावू लागले व हा त्यांच्यामागे धावतो आहे. शेवटी विष्णुला शंकराच्या मदतीला धावावे लागले. विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले व भस्मासुराला असे नाचवले, असे नाचवले की त्याने नाचताना त्याच्या स्वत:च्याच डोक्यावर हात येईल अशी मुद्रा केली. त्यामुळे भस्मासुराने स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवला व त्यामुळे त्याचे भस्म झाले. ही कथा जी आहे ती मोठी मार्मिक आहे. भस्मासुराने जसे केले ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म करीन तसे आज माणूस ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. म्हणजे दुस-याचे वाईट चिंतित आहे.