शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रियांवर ताबा ठेवायचाय? मनावर विजय मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 11:33 IST

मनातील कल्पनांनुसार इंद्रियांना चालना

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

इंद्रिय बलवान असतात. वासनेला पूर्णत्वाला नेण्याकडे त्यांची वाटचाल असते. मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात, त्यानुसार इंद्रियांना चालना मिळते. मनाप्रमाणे इंद्रिय वागतात. अपरिपक्व बुद्धी असलेल्या माणसाला विकार वश करतात. इंद्रियांच्या इच्छेनुसार मनुष्य वागला तर उंच स्थान निर्माण केलेल्या मनुष्यालाही खाली खेचतात. कारण मन अत्यंत प्रबळ आहे. प्रभावशाली असलेल्या मनावर विजय मिळवल्यास इंद्रिय ताब्यात राहातात. जो मनुष्य शांत, बुद्धिवान किंवा आत्मज्ञानी असतो, तो आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो. कारण ज्ञानी मनुष्य लाभ, हानी याचा विचार करीत नाही. तो शांत चित्ताने व प्रसन्न मनाने येणाऱ्या विषयाला तोंड देतो. शांतपणे एखादा विषय हाताळतो. सुख वा दु:ख याप्रसंगी तो समान भाव ठेवतो जो मनुष्य शास्त्रविदित कर्म करतो तो अनेक प्रकारच्या चिंतेतून मुक्तहोतो. तो नेहमी प्रसन्न असतो. तो आपल्या इच्छेनुसार सर्व कर्म करतो. त्या मनुष्याला शोक-मोह बाधत नाही. तो एखादे कार्य करत असतानाही जीवन्मुक्तासारखे करतो. तो सर्व भोगूनसुद्धा त्यात आसक्ती ठेवत नाही. कारण त्याला माहिती आहे, मनच सर्व सुख-दु:खाचे कारण आहे. त्यामुळे तो निर्मलतेने जीवन जगतो.मनामुळेच माणूस बंधनात अडकतो किंवा मनामुळेच त्याला मुक्ती मिळते. जीवन जगताना सर्व कार्य मनावर अवलंबून आहे. जीवात्मा किंवा इंद्रिय जे कार्य करतात ते मनानुसारच.. मनावरच भेदभाव अवलंबून आहे. शत्रूता, मित्रता, किंवा उदासीनता ही मनाचा खेळ आहे. एकात्मता किंवा अनेकात्मता मनावर असते. विद्यावान मनुष्य सहजतेने कर्म करतो. अविद्या ही भेद उत्पन्न करते. भेद उत्पन्न झाल्याशिवाय एकरचतेचा अनुभव येत नाही. त्यामुळे मनाचा व इंद्रियांचा संबंध लक्षात ठेवा, इंद्रिय इंद्रियांचा विषयात स्वत: रममाण होतात. त्यात आत्मा निर्विकार असतो; परंतु त्याचे दोषारोपण त्या आत्मावर होते. आत्मा तर नेहमी शुद्ध आहे. आत्मा कधी बंधनात नसतो. बंधन-मोक्ष ह्या सर्व मनाच्या प्रक्रिया आहेत. मनाला शांती मनच देऊ शकते. ज्याचे मन निर्मल आहे त्याला शांती मिळते.. ज्याचे मन निरंजन किंवा निर्विकार आहे त्याचा आत्मा बंधनात अडकत नाही. म्हणजेच इंद्रियांवर त्याने पूर्णपणे ताबा मिळवलेला असतो. मन निर्मल असले की सर्व निर्मल होते. इंद्रियांवर ताबा राहातो. इंद्रियांवर ताबा मिळवला की त्याचे वैराग्य सिद्धीत जाते. मग तो नि:संदेह मुक्ती मिळवतो.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक