शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हा ‘एक’ कुठून आला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 03:10 IST

शुक्रवार ते रविवार माझ्या घरात ध्यानाचे शिबिर व्हायचे, तेव्हा संध्याकाळी सान सा निम भाषण देत असत.

- धनंजय जोशीमाझ्या झेन गुरूंचे एक आवडते वाक्य होते, ‘टेन थाउजंड थिंग्स बिकम वन, व्हॉट डज द वन बिकम?’.. दहा हजार गोष्टी एकामध्ये विलीन होतात, मग एक कशामध्ये विलीन होतो? पहिल्यांदा या दहा हजार गोष्टी कोणत्या ते ओळखायला पाहिजे. ते ओळखल्यानंतर ‘एक’ कोण ते समजले पाहिजे. सान सा निम मला म्हणायचे, ‘दहा हजार वर्षे तरी साधना करायला पाहिजे!’मी मनात म्हणायचो, ‘हे तर फार लवकर काम झाले!’शुक्रवार ते रविवार माझ्या घरात ध्यानाचे शिबिर व्हायचे, तेव्हा संध्याकाळी सान सा निम भाषण देत असत. मला ते त्यांच्याबरोबर बसायला सांगत.पहिली पाच-सहा मिनिटे मी बोलायचे आणि नंतर ते बोलणार, अशी पद्धत होती. त्यांच्याजवळ बसून शिकणे हे माझे मोठे भाग्यच! एकदा ते भाषण देतानाम्हणाले, ‘साधनेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ‘मला पाहिजे - साधना’ या साधनेमध्ये आपण फक्तस्वत:चाविचार करतो. मला शांती पाहिजे, मला साक्षात्कारपाहिजे, मला निर्वाण पाहिजे.... सगळे ‘मलापाहिजे’ म्हणून ती ‘मला पाहिजे-साधना’. दुसरीसाधना म्हणजे ‘परोपकारी- साधना’. ही साधना ‘माझ्या’साठी नसतेच मुळी. मी साधना करायची,पण ती फक्तदुसऱ्यासाठी. मी जेवतो कशासाठी? मीजेवतो तुमच्यासाठी. मला जरी साक्षात्कार झाला, तरी मी तो अर्पण करतो तुम्हाला. ध्यान साधनासंपल्यानंतर उठायच्या आधी त्या साधनेचे फळसंबंध जगाला वाहून द्यायचे. म्हणून ती ‘परोपकारी-साधना’. त्या साधनेमध्ये सर्व जग एक होऊन जाते. दहा हजार ते एक!’एकदा एकाने हात वर केला, ‘मला एक प्रश्न आहे’सान सा निम म्हणाले, ‘प्लीज आस्क!’‘तुम्ही म्हणता सर्व एक झाले असेल तर मग कोण कुणासाठी साधना करतो?’सान सा निम हसून म्हणाले, ‘हा ‘एक’ कुठून आला ते कळले म्हणजे समजेल!’