शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मानव जातीचे कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 02:19 IST

मला यशस्वी जीवन जगायचे आहे, मला शांती हवी आहे आणि मला एक शांततामय जग निर्माण करण्यास मदत करावीशी वाटते. माझ्यासाठी मी केवळ एक चांगली व्यक्ती बनणे, पुरेसे आहे का?    

- जग्गी वासुदेव

प्रश्न: मला यशस्वी जीवन जगायचे आहे, मला शांती हवी आहे आणि मला एक शांततामय जग निर्माण करण्यास मदत करावीशी वाटते. माझ्यासाठी मी केवळ एक चांगली व्यक्ती बनणे, पुरेसे आहे का?    सद्गुरू : तुम्ही केवळ एक चांगली व्यक्ती असणे, पुरेसे नाही. तुम्हाला या जगात राहायचे असेल, तर तुम्ही सक्षम असणेसुद्धा गरजेचे आहे. सर्वप्रथम तुम्ही चांगली व्यक्ती आहात, असे तुम्हाला कशामुळे वाटते? तुमच्या अवती-भोवती असणारी दहा माणसे काही ना काही कारणास्तव चांगली नाहीत आणि त्यांच्या तुलनेत तुम्ही अधिक चांगले आहात, असा निष्कर्ष तुम्ही काढत आहात. तुम्ही चांगले आहात याचा जितका अधिक विचार तुम्ही कराल, तितके अधिक इतर कोणीही चांगले नाही, असे तुम्हाला वाटू लागेल. जर कोणीही चांगले नसेल, तर तो नैतिकतेचा प्रश्न नसून, मूर्खपणाचा आहे. इतर कोणीही चांगले नाही, असा विचार करायची सुरुवात करणे हे मानसिक विकृतीचे पहिले लक्षण आहे.चांगले ‘म्हणवून घेणारे’ काही लोक साधे हसूसुद्धा शकत नाहीत. का माहिती आहे का तुम्हाला? कारण त्या खूप चांगल्या व्यक्ती असतात. अनुभवामधून तुम्हाला हे स्पष्ट दिसेल की, तुमच्या जीवनाची गुणवत्ता, तुमची शैक्षणिक पात्रता, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा बँकेत किती रक्कम तुम्ही साठवली आहे, यावरून निश्चित केली जात नाही. या क्षणी, केवळ अंतर्मनातून तुम्ही किती शांत आणि आनंदी आहात, यावरून तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरते. योग आणि ध्यान या विज्ञानाच्या अशा बाजू आहेत, ज्या तुमचे अंतर्मन हाताळतात, ज्यामध्ये अंतर्मनात योग्य वातावरण निर्मिती करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाते, त्यामुळेच प्राथमिक गोष्ट ही आहे की, ‘मनुष्यजातीचे कल्याण’ हे जर तुमचे कार्यक्षेत्र असेल, तर तुम्ही स्वत:कडे आधी लक्ष्य द्या, तरच तुम्ही मानवतेच्या कल्याणसाठी काहीतरी ठोस आणि स्थायी कामगिरी बजावू शकाल.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक