शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 02:49 IST

सत्संग मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो..

माणूस जसा जसा भौतिक सुखांच्या गर्तेत अडकत जातो तसे तसे त्याला अहंकार, स्वार्थ, क्रोध, मोह , माया, मत्सर यांची बाधा होते. तो मग आनंदाच्या एका एका क्षणाला परका होत दुःखाच्या खोल डोहात डुबत जातो. हे दुःखच मग मनुष्याच्या अपयशी, नैराश्यमय जीवनाचे कारण ठरते.. पण अध्यात्म, सत्संग ही दुःखावरची प्रभावी मात्रा तर आहेच शिवाय सुखाचा चिरंतन दरवळ भोवती पेरणारी अत्तरदाणी आहे. पण या सुखालाही एक दिशा ,विश्वास, आधार, प्रेरणा; अभ्यास, आणि आध्यात्मिक क्षेत्रातली उत्तुंग भरारी साधलेली एक 'गुरु' किल्ली हवी...नाहीतर मग माणूस सगळं काही असून देखील समुद्रात वादळात सापडलेल्या दिशाहीन जहाजासारखा भरकटत जातो.. पण ज्याला कुणाला सत्संग लाभला तो हळूहळू स्वतःला ओळखू लागतो...सत्संग मग त्याच्या मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो....पण तो सत्संग लाभण्यासाठीच गुरुकृपेची भेट घडावी लागते..त्याच गुरुतत्वाची ओळख करून देणारी असंख्य उदाहरणे आहेत..त्यापैकीच एक.. एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करत होते. तेव्हा त्यांना आवाज आला की खाली उतर. मग बोटीतून ते लगेच उतरले. पण त्यांना कळले नाही की त्यांच्या गुरूने त्यांना असा आवाज का दिला. थोड्या वेळाने वादळात ती बोट बुडाली व सर्वजण बुडून मेलेत हे ऐकून त्यांना फार वाईट वाटले व रागही आला. कारण ते रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते व त्यांनाच त्यांनी आवाज दिला. बाकी त्यांचे शिष्य नव्हते. म्हणून त्यांनी त्यांना आवाज दिला नाही. मग गुरू हे स्वार्थी आहेत असे त्यांना वाटले व त्यांनी गुरूंना याबाबतीत विचारले. गुरू म्हणाले, नरेद्र असं नाही; जे तू समजतोस. मी सर्वांना सारखाच आवाज दिला. पण तुझ्या आतील पावित्र्यामुळे तो आवाज फक्त तुला ऐकू आला; बाकीच्यांना नाही. तू आतून एकदम शुध्द आहेस कोणतेही विकार नाहीत म्हणून तुझे व माझे कनेक्शन जोडले आहे. त्यामुळे मी कायम तुझ्याबरोबरच असतो व तुला जे सावध करतो ते तुझ्यापर्यंत पोहचते व कठीण प्रसंगी तू मार्ग काढतो वास्तविक मीच त्या सूचना करत असतो.म्हणून आपले मित्रमंडळी नातेवाईक प्रत्येकजण आपल्या बरोबर कायम असतीलच असे नाही. पण आत जो बसलेला आहे तो प्रत्येकात प्रत्येकाच्या एकदम जवळ आहे. त्याबाबतीत म्हणता येईल "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". पण आपले लक्ष बाहेर. आत आपण कधी डोकावतच नाही..

आपल्या डोक्यात नुसती नकारात्मकता, द्वेष, भरलेली आहे... सतत आपल्या मनातील संशयी वृत्ती आपल्याला अस्वस्थ करत असते.. भीतीने आपण आतून बाहेरून पूर्णतः पोखरलेलो आहोत..पण या सगळ्या कल्लोळात आपण स्वतःचे अतोनात नुकसान करून घेत आहोत.. आणि जगभर परमेश्वर शोधत फिरतो आहे..पण साधू संतांनी सांगितलेली त्या विधात्याची दर्शनाची साक्षात दृष्टांत मिळवण्याची पद्धत किती सहजपणे आपण विसरलोय नाही नाही त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहोत.. त्यामुळे आत जो बसला आहे त्याचे कनेक्शन तुटले आहे. म्हणून आपल्यापर्यंत त्याच्या सूचना पोहोचत नाहीत व आपल्याला दु:ख प्राप्त होते... .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक