शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

संघभावना ही यशाची गुरुकिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 23:08 IST

विवेकानंद म्हणाले, ""जिच्या प्रेमात मी पडतो ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून, ती संघटना होय...

- डॉ.दत्ता कोहिनकरएका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो. त्याला विचारले, ""काय भाव आहे द्राक्षांचा...? तो म्हणाला, ""साठ रु. किलो जवळच, सुटी द्राक्षे ठेवली होती. त्याला म्हणालो, ""यांचा काय भाव आहे? तो म्हणाला, ""पंचवीस रुपये किलो पुन्हा विचारले, ""यांचा भाव साठ रुपये व यांचा भाव 25 रुपये असे का?तो म्हणाला, ""साहेब दोन्ही द्राक्षे एकाच बागेतली आहेत. दोन्ही गोड व चांगलीच आहेत; पण ही घडात - एकसंघ असल्याने साठ रुपये व ही घडातून तुटून एकेक झाल्याने 25 रुपये. मी समजून गेलो. *जोपर्यंत आपण एकसंघ आहोत, तोपर्यंत आपली किंमत उच्चतम असते. ज्या क्षणी आपण संघातून विलग होऊन एकटे होतो, तेव्हा आपली किंमत खूप खाली येते* म्हणून कुटुंबात - नातेवाइकांत, संघात राहण्यासाठी आपली धडपड चालू असते. एकटा माणूस फार मोठे काम करू शकत नाही. त्यासाठी संघाचीच गरज असते. अमेरिकेत विवेकानंद आपल्या भाषणात म्हणाले, ""आज मी एकीच्या प्रेमात पडलोय. सगळी सभा अवाक झाली, विचार करू लागली अशी कोण, नशीबवान युवती आहे जिच्या प्रेमात हा राजबिंडा योगी पडला आहे? विवेकानंद म्हणाले, ""जिच्या प्रेमात मी पडतो ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून, ती संघटना होय, टीम होय. विवेकानंदांनीदेखील संघभावनेचे महत्त्व पटवून दिले होते. भगवान बुद्धदेखील म्हणतात "संघम्‌ शरणम्‌ गच्छामि!पानिपतच्या युद्धात अहमदशाह अब्दाली रणनीतीची आखणी करत असताना नदीच्या पलीकडच्या काठावरील मराठ्यांच्या छावणीची पाहणी करत होता. त्या वेळी मराठ्यांच्या छावणीत जागोजागी चुली पेटलेल्या त्याला दिसल्या. मराठ्यांचे सैन्य नेमके किती याची विचारणा त्याने गुप्तहेराकडे केली, तेव्हा त्याने सांगितले, ""मराठ्यांचं सैन्य फारसं नाही. तेथील प्रत्येक सैनिकाने आपल्या स्वयंपाकासाठी स्वतंत्र चूल पेटवली आहे.ह्यह्य त्यावर चुटकी वाजवून अब्दाली म्हणाला, ""आपण शंभर टक्के युद्ध जिंकणार. कारण जे सैनिक अन्न शिजवतानाही एकत्र येत नाहीत, ते राष्ट्रासाठी एकदिलाने कसे लढतील? पानिपतचा, इतिहास आपणास माहीतच आहे म्हणून संघाने एकत्र येणे ही आवश्‍यक गोष्ट आहे. संघात लोक वेगवेगळ्या विचारांचे असतात. म्हणतात ना, "व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती, त्यांना एकत्र बांधून ठेवणे हे नेत्याचे कैशल्य असते. भगवान बुद्ध म्हणतात, "एकमेकांना समजून घेणारा, एकमेकांवर प्रेम करणारा, एकमेकांना पडत्या काळात साथ देणारा, एकमेकांचे हित चितणारा, एकमेकांची प्रगती करणारा, एकमेकांचा आदर करणारा असा संघ नेहमी पुढे जातो.म्हणून संघभावना टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या अहंकाराला तिलांजली देणे आवश्‍यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, की सुशिक्षित लोकांना एकत्र आणणे म्हणजे बेडकांचे तराजूत वजन करण्यासारखे आहे. एक तराजूत टाकताना दुसरा झटकन उडी मारून बाहेर पडतो म्हणून संघ तयार करून सर्वांनी एकविचारांनी एकत्र राहणे आवश्‍यक असते. यासाठी नेता हा देखील निःस्वार्थ व लोकप्रिय असावा लागतो. नेपोलियनचे सैनिक त्याने दिलेला आदेश तंतोतंत पाळायचे. त्यावर कोणीही प्रतिप्रश्‍न करीत नसत किंवा शंका घेत नसत. नेपोलियनचे यश यातच दडलेले होते. एकता व आज्ञाधारकता एकत्र आली आणि संघभावना वाढीस लागली, की यशाची दारे उघडणे सोपे जाते.

 

टॅग्स :PuneपुणेSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदAdhyatmikआध्यात्मिक