शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निर्लेप मनाचे कर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:28 IST

पार्था, तुला मी एकच निखळ सत्य सांगतो की, आपण जेव्हा कर्म करीत असतो,

- वामन देशपांडेभगवंतांनी मोठ्या प्रेमाने महत्त्वाचा विचार दिला की, गहना कर्मणो गति:।।गीता : ४ :१७।। पार्था, तुला मी एकच निखळ सत्य सांगतो की, आपण जेव्हा कर्म करीत असतो, तेव्हा करीत असलेल्या कर्मापासून मनाने अलिप्त होत, कर्म पूर्ण करणे हाच खरा, कर्माचे तत्त्व जाणून घेत, कर्म करीत राहण्याचा सर्वोेत्तम मार्ग आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर निर्लेप मनाने कर्म करणे म्हणजे अकर्माला जाणून घेणे आहे. कमलपत्र जसे पाण्यावर तरंगत असतानासुद्धा पाण्याचा एक थेंबसुद्धा स्वत:ला स्पर्शू देत नाही ना, त्याप्रमाणे कर्म करूनही, कर्तेपणापासून अलिप्त होत कर्मात दंग होणे, हेच निष्काम कर्मयोगाचे रहस्य आहे. पार्था, कुठले कर्म मानवी असित्वाला मुक्त करणारे आहे आणि कुठले कर्म बंधनात अडकविणारे आहे. याचा निर्णय करणे खूपच कठीण आहे. म्हणून निष्काम कर्मयोगाचे तत्त्व जाणून घेणे खूपच गहन आहे. मनातल्या कामना एकदा का संपल्या की, कर्मे अकर्मे होतात आणि मनात कामनांचा पिंगा सुरू झाला की, करीत असलेले कर्मे विकर्मे, म्हणजे पापकर्मे होतात. म्हणून प्रत्येक साधक भक्ताने प्रथम कामनांचा आणि वासनांचा नि:पात करून, मगच कर्म करण्यासाठी उद्युक्त व्हावे. भगवंत अर्जुनाला फार महत्त्वाचा संदेश देतात की,कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते सद्दो स्त्वकर्मणि।।गीता : २:४७।।पार्था, वर्णाश्रम धर्मानुसार आपली जी कर्तव्यकर्मे असतात ना, ती आपण पार पाडणे, हा प्र्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु त्या कर्माचे जे फळ असते ना, त्या फळावर कर्त्याचा अधिकार नाही. म्हणून पार्था, तू प्राप्त होणाऱ्या फळाचा हेतू चुकूनही होऊ नकोस आणि मला कर्म करायचे आहे, या भावनेतसुद्धा तू गुंतू नकोस. मनात कर्माची वा कर्मफलाची आसक्ती बाळगू नकोस. प्राप्त कर्माचे पालन करणे एवढेच फक्त तुझ्या हातात आहे. तू कायम लक्षात ठेव की, परमेश्वराने हा नरजन्म जो दिला आहे ना, तो तुझा उद्धार व्हावा, म्हणून दिला आहे. कर्मफळ हा हेतू उद्भवता कामा नये. थोडक्यात, कर्मावर अधिकार आहे, कर्मफळावर तुझा अधिकार नाही. सुख दु:खांनी लेपटलेले आयुष्य माणूस आयुष्यभर जगत असतो. पूर्व प्रारब्ध जसे आणि जेवढे असेल, तेवढे हे दोन्ही भोग हे भोगावेच लागतात. कारण प्रारब्धाचा नाश करण्याचे सामर्थ्य कोणापाशीही नाही, परंतु माणूस या जगत असलेल्या मानवी योनीचा विवेकाच्या साहाय्याने सदुपयोग करू शकतो. ही किमया तेव्हा घडते, जेव्हा मन आपले चंचलत्व पूर्णपणे आसक्त, परमेश्वरी अस्तित्वाची जाणीव पूर्णांशाने करून घेऊन मर्त्य संदर्भ दूर सारत, समभावाने विचार करू लागते. साधकाने सुखाचा वा दु:खाचा संदर्भ आपल्या आत्मतत्त्वाने जगत असलेल्या आयुष्याशी कदापिही जोडू नये. भगवंत म्हणतात,सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।ऐन युद्धप्रसंगी पार्था, तुला असे वाटू लागले आहे की, हे कौरव आमचे कुटुंबीयच आहेत आणि त्यांना ठार मारले तर पाप लागेल. म्हणून हे युद्धच नको. पार्था, तू एक प्रथम लक्षात घे की, पापाची कारणमीमांसा युद्ध नसून, तुझी ही कामना पापाची जननी आहे. जय-पराजय, लाभ-हानी, सुख-दु:ख यांचा तू प्रथम समान समज. ही सर्व मनातील द्वंद्वे आहेत. मनात कुठल्याही स्वरूपाचे भावविश्व निर्माण न करता तू फक्त युद्ध कर. तेच तर तुझे विहित कर्म आहे. कारण तू क्षत्रिय आहेस. या युद्धामुळे तुला पाप लागणार नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक