शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू नावाचे सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 06:33 IST

एकंदरीत काय, मृत्यू नावाची कालभक्षक शक्ती अशी आहे की जिच्यासमोर भणंग भिकाºयापासून ते महासम्राटासमोर सगळे समान आहेत.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमृत्यू नावाच्या सर्वभक्षक शक्तीचे अचूक वर्णन करणारी एक बोधकथा बुद्ध चरित्रात मिळते. ‘किसा गौतमी नावाच्या वृद्धेच्या एकुलत्या एक मुलाचा अचानक मृत्यू होतो, तेव्हा ही वृद्धा भगवान गौतम बुद्धांकडे जाते व बुद्धास विनंती करते की, ‘मला माझा मुलगा परत हवा, त्याला जिवंत करा.’ यावर गौतम बुद्ध उत्तर देतात, ‘जरूर मी तुझ्या मुलास जिवंत करेन, पण तत्पूर्वी एक काम कर ज्या घरात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही अशा घरातून मला मूठभर मोहऱ्या आणून दे!’ किसा गौतमी घर-घर फिरली, पण तिला एकही घर असे सापडले नाही जेथे कुणाचाच मृत्यू झाला नाही. शेवटी ती बुद्धांकडे परत गेली व बुद्धाने तिला जीवन-मृत्यूच्या अढळ सत्याचा सदउपदेश दिला.

एकंदरीत काय, मृत्यू नावाची कालभक्षक शक्ती अशी आहे की जिच्यासमोर भणंग भिकाºयापासून ते महासम्राटासमोर सगळे समान आहेत. त्याच्या विळख्यातून कुणाचीच सुटका होऊ शकत नाही. आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनेक सखे-सोबती व नात्यागोत्याचा गोतावळा गोळा होतो. काही काळ जीवनाची यात्रा रसमय होते, पण जगण्याचा सुंदर क्षण अनुभवताना मरणाचे स्मरण असावे. ज्याचे नेमके वर्णन करताना भगवद्गीतेत म्हटले आहे -

वासांसि जीर्णानि यथा विहायनवानि गृन्हन्ति नरोपरानीतथाशरिराणि विहाय जीर्णानिअन्यानि संयाति नवानि देही।।

संत ज्ञानेश्वर माउलीने यावर सुंदर भाष्य करताना म्हटले आहे, जसे जीर्ण झालेला कपडा आपण टाकून देतो व नवा परिधान करतो तसे चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसºया देहाचा स्वीकार करतो. या विवेचनाचा अर्थ असाही नव्हे की हे जीवन कसले मरणाची माला, मासोळी झोंबते तोडावयासी गळाला असे मरत-मरत जगावे. खरं तर मरत-मरत जगणाºयास जगण्याचा आस्वादच मिळत नाही. त्याचा अर्थ एवढाच, जगण्याला विचारांचे अधिष्ठान असावे.

आज धनिक म्हणून जगताना धनाची विल्हेवाट कशी लावावी या विवंचनेत जगण्यातला आनंदच नष्ट होतो, तर निर्धन म्हणून जगताना आयुष्यच दु:खाचे कोठार वाटू लागते. यापेक्षा जगण्याच्या मुक्कामात मिळणाºया भौतिक वस्तूत दुसºयाचाही वाटा आहे. जाण्यासाठी तर सारेच आले आहेत, पण गेल्यानंतरही काही शतके उत्तम कीर्तीचा सुगंध जर या पृथ्वीतलावर दरवळत राहिला तर तेच खरे अमरत्व, मोक्ष वा मुक्ती होय.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक