शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

संतांची खरी शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 2:32 AM

- मोहनबुवा रामदासी साधु दिसती वेगळाले । परी ते स्वरूपी मिळाले । अवघे मिळोनयेकचिजाले । देहातीतवस्तू ।। आपला महाराष्ट्र ...

- मोहनबुवा रामदासी

साधु दिसती वेगळाले । परी ते स्वरूपी मिळाले ।अवघे मिळोनयेकचिजाले । देहातीतवस्तू ।।आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आज या विश्वात, जी काही शांती, समाधानाची ज्योत या भयंकर कलीकाळोखातही टिकून आहे, ती संतांची देणगीच आहे. संत ही हिंदुस्थानची खरी शक्ती आहे. जगात जेव्हा दुष्ट शक्ती डोके वर काढतात तेव्हा संतांची शिकवण ध्यानात ठेवत सज्जन हे दुर्जनांशी दोन हात करीत असतात. संयम आणि योग्य वेळी प्रतिकार यांचा समन्वय हा संतांच्या विचारांतूनच सर्वसामान्यांच्या मनावर ठसत असतो. संतांची शिकवण हीच कायम सन्मार्गावर चालण्यासाठी उपयोगी पडत असते. मात्र वर्तमानकाळी संतांचे जातीपातीनुसार विभाजन करून त्यांच्या कर्तृत्वाला तोकडेपणा आणण्याचे महत्पाप आपण करीत आहोत. संतांचे विचार ज्याला खरोखरच पटलेले असतात तो ते विचार आपल्या आचरणात आणतात. जे केवळ ढोंग करीत असतात त्यांना संत खरे कळलेलेच नाहीत, असे म्हणावे लागेल. आज आपला देश खऱ्या अर्थाने समर्थ व अखंड हिंदुस्थान निर्माण करावयाचा असेल तर जातीभेद, सांप्रदायभेद, वर्णभेद, उच्च-नीच भाव इत्यादी जळमटांना दूर सारून ऐक्याचे दर्शन घडवले पाहिजे. यासाठी दासबोध, मनाचे श्लोक, तुकारामांची गाथा, नाथांचे भागवत, संत नामदेवांचे अभंग, इतरही संतांचे साहित्य आपण भक्तांच्या भूमिकेतून अभ्यासणे आवश्यक आहे. या अनुषंगाने श्रीसमर्थांनी केलेला हा उपदेश अत्यंत मार्मिक आहे. संत जरी विविध गुणकर्मानुसार बाह्यांगाने वेगळे दिसत असले तरी ते अंत:करणाच्या स्थितीने एकरूपच झालेले असतात. परंतु अनुयायी त्यांच्या उपदेशाचा भावार्थ समजून त्याप्रमाणे आचरण न करता मतभेद निर्माण करतात. असे न करता सर्व समाजाने आपापल्या उपासना पद्धतीचे अनुकरण करावे व इतरांच्या दैवत व उपासनामार्गाविषयी आदरभाव ठेवावा. समाजात प्रेम वृद्धिंगत करावे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक