शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २७, विचार प्रदुषण हा जीवनविद्येचा शोध आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 07:00 IST

माणूस हा दु:खी होतो, सुखी होत नाही याचे नेमके कारण काय हे शोधून काढण्याचा प्रयत्न मानवजातीने कधी केला असे मला मुळीच वाटत नाही आणि जे प्रयत्न केले ते योग्य दिशेने केले नाहीत. प्रयत्न अयोग्य दिशेने झाल्यामुळे माणूस सुखी होण्याऐवजी दु:खी होतो आहे

ठळक मुद्दे काळजी, चिंता, द्वेष, मत्सर, तिरस्कार या गोष्टीच मनात सतत चाललेल्या असतात.मानवी जीवनात सैतान हा अज्ञानरुपाने वावरत असतो.थोडक्यात दुस-यांच्या दु:खाने सुखी होतो तो दानव, दुस-यांच्या दु:खाने दु:खी होतो तो मानव व दुस-यांच्या सुखाने सुखी होतो तो देव जाणावा.

- सदगुरू श्री वामनराव पैमाणूस हा दु:खी होतो, सुखी होत नाही याचे नेमके कारण काय हे शोधून काढण्याचा प्रयत्न मानवजातीने कधी केला असे मला मुळीच वाटत नाही आणि जे प्रयत्न केले ते योग्य दिशेने केले नाहीत. प्रयत्न अयोग्य दिशेने झाल्यामुळे माणूस सुखी होण्याऐवजी दु:खी होतो आहे. ज्याप्रमाणे नदी वहात वहात समुद्राला जावून मिळते त्याप्रमाणे  माणसाचे मन हे नेहमी विचाररूपाने वहात असते. विचार नाही असे कधीच होत नाही. स्वप्न सुध्दा पडतात ते ही विचारांचे दृश्य रूप असते. झोपेत विचारांना दृश्य रूप प्राप्त झाले की ते स्वप्न असते. त्यामुळे जी स्वप्न पडतात ती विचारांमुळेच पडतात. फक्त गाढ झोपेत माणूस विचार करत नाही. मात्र अंर्तमनात विचार चाललेले असतात. अंर्तमन श्वासोच्छवास करतच असते. बहिर्मन जेव्हा स्थगित झालेले असते तेव्हा माणूस विचार करण्याचे थांबतो. माणसाचे मनात ही विचारांची नदी सतत वहातच असते. त्याचे मन हे काहीतरी कृती करण्याचा विचार करत असते.काळजी, चिंता, द्वेष, मत्सर, तिरस्कार या गोष्टीच मनात सतत चाललेल्या असतात. हे एक प्रकारचे विचार प्रदुषण आहे.

विचार प्रदुषण हा जीवनविद्येचा शोध आहे. विचार प्रदुषण हे माणसाच्या दु:खाचे मूळ आहे,परंतू दुर्देवाची गोष्ट अशी की या सत्याचे ज्ञान मानवजातीला झालेले  दिसत नाही व त्यामुळे त्या मूळ समस्येवर उपाय योजनासुध्दा केली जात नाही. मानवी जीवनात सैतान हा अज्ञानरुपाने वावरत असतो. या अज्ञानातूनच अहंकार, अभिमान, अविचार, अविवेक, असूया व असमाधान अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी निर्माण होवून विचार प्रदुषण निर्माण होते. माणसाची बुध्दी देव होण्याऐवजी दानव होण्याकडे झुकते. ती देव नसते म्हणून तर जगात सुख पहाता जवापाडे व दु:ख पर्वताएवढे अशी वस्तुस्थिती आहे.

“देव कुठेतरी स्वर्गात, दानव कुठेतरी पाताळात व मानव पृथ्वीवर” असा काल्पनिक प्रकार प्रत्यक्षात नाही. माणसांमध्येच देव दानव व मानव असतात. कृष्ण हा देव होता तर त्या कृष्णाचा मामा कंस हा दानव होता व तोच कृष्ण ज्याच्या घरी वाढला तो नंद मानव होता म्हणून माणसे ज्या पध्दतीने विचार करतात, बोलतात व आचार करतात त्यावर माणसे कशी होणार हे ठरत असते. थोडक्यात दुस-यांच्या दु:खाने सुखी होतो तो दानव, दुस-यांच्या दु:खाने दु:खी होतो तो मानव व दुस-यांच्या सुखाने सुखी होतो तो देव जाणावा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार ज्यांना आवरता येतात ते मानव, ज्यांना आवरता येत नाहीत ते दानव व ज्यांच्या वृतीवर विकार उठतच नाहीत ते देव जाणावे.