शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:21 IST

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे ...

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे याने खरेच पुण्य मिळेल का? पितरांचा आत्मा शांत होईल का? याचा विचार आपण कधी करणार? 

अक्षय्यतृतीया... साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! पितरांचे स्मरण करण्याचा दिवस. या दिवशी पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया आदी वाढून सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांंचा आत्मा शांत होतो असे मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात एवढं सर्व करायला वेळ नसला तरी अनेक जण पितरांच्या नावे अन्नदान करतात. काही जण ते पाण्यात सोडतात तर काही कावळ्यांना खाऊ घालतात.

सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारच्या वेळी कावळेही दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे यंदा पितरांचा आत्मा शांत करायला कावळे मिळतील का, असा प्रश्नही अनेकांना सतावत आहे. पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे याने खरेच पुण्य मिळेल का? याचा विचार आपण कधी करणार? आजचे कुटुंब त्रिकोणी किंवा चौकोनी पद्धतीचे आहे. मम्मी-डॅडी आणि चिंटी, बंटीच्या कुटुंबात आजी-आजोबांना जागा नाही. ते त्यांच्या स्टेटसमध्ये बसत नाहीत. त्यामुळे काहीजण आपल्या वृद्ध माता-पित्याची रवानगी वृद्धाश्रमात करतात. ज्यांना प्रेमाने घडवले, लहानाचे मोठे केले, त्यांच्याकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीने म्हाताºया आई-वडिलांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात, पण त्यांच्या डोळ्यातले पाणी त्यांच्या मुलांना दिसत नाही. त्यांच्या डोळ्यावर हायफाय स्टेटस, आपला संसार, आपली मुले... अशी संकुचित विचारांची पट्टी असते. आणि या आपल्यांमध्ये आई-वडिलांना थारा नसतो.

काही जण आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवायला नको, घरात स्वयंपाक करायला नको, म्हणून आई-वडिलांचा अक्षरश: नोकरांसारखा वापर करून घेतात. काही अपवाद वगळता आज अनेक घरात असेच काहीसे चित्र हमखास पाहायला मिळते. मुलांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, वाढता दुरावा यामुळे आई-वडिलांना मात्र जीवन नकोसे होऊन जाते. मरणाची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो आणि मग कधीतरी हवेहवेसे वाटणारे मरण त्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकते आणि सुटलो एकदाचे म्हणून ते निमूटपणे डोळे मिटतात.

आई गेली, वडील गेले की मग त्यांच्याशी निष्ठूरपणे वागणाºया याच मुलांच्या डोळ्यांत पाणी जमा होते. आईचे किंवा वडिलांचे श्राद्ध घातले जाते. त्यांच्या आवडीचे सर्व खाद्यपदार्थ कावळ्याला खाऊ घातले जातात. माझी आई फार प्रेमळ होती, वडील खूप चांगले होते... असे म्हणत जुन्या आठवणींना  उजाळा दिला जातो. कावळ्याने दिलेले अन्न खाल्ले की आई-वडिलांचा आत्मा तृप्त झाला, असे मानले जाते. काय म्हणावे असल्या प्रेमाला आणि जिवंतपणी आई-वडिलांना मरणोप्राय यातना देऊन मेल्यानंतर त्यांचा आत्मा शांत करण्यासाठी धडपडणाºया त्यांच्या स्वार्थी मुलांना?

या सर्वांची आठवण होण्यामागचे कारण म्हणजे अक्षय्य तृतीया, हा दिवसही खास पितरांसाठीच असतो. त्यांचे स्मरण करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठीच असतो. पण, मेलेल्यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद हवे असतील तर घरातील वृद्ध, जिवंत आई-वडिलांची सेवा करायला हवी. निदान त्यांचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यांना काय हवे, काय नको, याकडे किमान लक्ष द्यायला हवे, एवढे केले तरी त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. तुमचे अनुकरण तुमची लहान मुले करतील आणि त्यामुळे त्यांच्यावर नकळतपणे जे संस्कार होतील त्यातून तुमचा वृद्धापकाळही सुखाचा होईल. म्हणूनच आजच्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पितरांचे स्मरण करण्यासोबतच जिवंत वृद्ध माता-पित्यांची प्रेमाने काळजी घेण्यास सुरुवात करू या आणि त्यांच्या आशीवार्दाने जीवनातील अक्षय्य आनंद, सुख-समृद्धीच्या दिशेने वाटचाल करुया ! 

- गौरीशंकर कंटीकर महास्वामी, शेळगी

टॅग्स :SolapurसोलापूरAkshaya Tritiyaअक्षय तृतीयाAdhyatmikआध्यात्मिक