शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आयुष्याची बेरीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 00:38 IST

जब तुम पैदा भयें जगत में, तुम रोएँ जग हाँसे । ऐसी करनी कर चलो, की तुम हाँसे जग रोएँ ॥

- प्रा. शिवाजीराव भुकेले

राजकुमार सिद्धार्थाचा गौतमबुद्ध होण्यापाठीमागे सिद्धार्थाच्याच जीवनातील एक बोधप्रद कथा नेहमी सांगितली जाते की, पाटलीपुत्रचे महाराज शुद्धोधन यांनी आपल्या राजकुमार सिद्धार्थाची मानवी जीवनातील दु:खावर नजर पडू नये म्हणून एक सुंदर शिशमहाल बनविला. सिद्धार्थ व यशोधरा त्यात राहू लागले; पण एके रात्री सिद्धार्थ अचानक महालाच्या बाहेर पडले. पाटलीपुत्रच्या रस्त्यावर त्यांना प्रथम दिसला तो दुर्धर आजाराने ग्रासलेला एक तरणाबांड मनुष्य. थोडे पुढे गेल्यावर दिसली ती वार्धक्याने जर्जर झालेली वृद्धा. आणखी थोडे पुढे गेल्यावर दिसली ती एका सद्गृहस्थाची अंत्ययात्रा. या साऱ्या घटनांचा सिद्धार्थाच्या मनावर एवढा खोलवर परिणाम झाला की, त्यांचे संवेदनशील मन विचार करू लागले.ओ ! क्षणभंगूर भव राम-राममैं भाग रहां हूँ निस्सार देखमेरी ओर निहार देख ।मैथिली शरण गुप्तजींच्या ओळी थोड्याफार फरकाने इथे एवढ्यासाठीच मांडल्या की, आयुष्याची गोळाबेरीज करायचीच ठरविली तर बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि मृत्यू या पंचसूत्रीच्या खेळात आयुष्याचे रहाट-गाडगे फिरत राहते. आयुष्याच्या वाटेवर एवढे काटे असतील, तर असे शेळपट आयुष्य मला नको. मी यापलीकडे एखाद्या शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी जन्माला आलो आहे, असा शाश्वत विचार करून सिद्धार्थाने राज्य वैभवावर लाथ मारली आणि सिद्धार्थामधून ज्ञानाचा संदेश देणारे आणि आयुष्याला प्रज्ञा, शील, कारुण्याची देणगी देणारे ‘गौतमबुद्ध’ जन्माला आले; परंतु आमचे मात्र तसे होत नाही. कारण आमचे आयुष्य एवढे संवेदनाहीन झाले आहे आणि भावना एवढ्या गोठल्या आहेत की, आम्ही मी आणि माझेच्या पलीकडे जायलाच तयार नाही. आयुष्यातील प्रत्येक अवस्थेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला आम्हाला कधी वेळच मिळत नाही. अनेक प्रतिकूल घटनांच्या प्रवाहाने मन मुर्दाड झाले आहे आणि भौतिक साधनांच्या गदारोळात शरीर यंत्र झाले आहे. दुसºया बाजूला आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेकडे जाणीवपूर्वक पाहणारे तुकोबाराय म्हणतात -अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते आर्धरात्र खायमध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मग काय भजनासी उरले ते पाहे गा ।आयुष्याची सरासरी बेरीज शंभर वर्षांची आहे, असे मानले तर अनेकांची पन्नास वर्षे रात्री झोपेत निघून जातात. आयुष्यातील पहिली दहा-बारा वर्षे बालपणात निघून जातात. सत्य, असत्य, धर्म, अधर्म, कर्म, ज्ञान आणि लौकिक जीवनातील या सर्वांच्या पलीकडे निरागस बालपण असते. म्हणून त्याला नेणतेपणाचा काल मानले जाते. पण, आज घराघरांत बालकांच्या हातात आलेल्या ‘पबजी’रूपी नरकाच्या वणव्याने बालपणच करपून जाऊ लागले आहे. तारुण्याच्या ‘मदा’चे विचारायलाच नको. आव्हानाच्या डोंगरांना भेदून स्वअस्तित्वाचा नवा प्रकाश निर्माण करणारे तारुण्य आता फक्त भुकेकंगाल पोटी भुंकण्याचे काम करत आहे. प्रौढत्व येते ते ‘झापडे’ बांधूनच आणि शेवटी उरते ते केलेल्या चुकांचा पश्चात्ताप करणारे आणि मरणाची वाट पाहणारे वृद्धत्व. मग, वेगळे काहीतरी करण्यासाठी आयुष्यात शिल्लक ते काय राहते? हो राहते! आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेकडे जर जाणीवपूर्वक पाहिले तर आयुष्याच्या सायंकाळीसुद्धा कबीराच्या शब्दांत निर्धास्तपणे म्हणता येते -जब तुम पैदा भयें जगत में, तुम रोएँ जग हाँसे ।ऐसी करनी कर चलो, की तुम हाँसे जग रोएँ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक