शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

होम-हवन करताना मंत्रांच्या शेवटी 'स्वाहा' का म्हटलं जातं? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 16:50 IST

हिंदू धर्मात होम-हवनाला सर्वात पवित्र धार्मिक कार्य मानलं जातं. लग्न असो वा कोणताही धार्मिक कार्यक्रम नेहमीच लोक होम-हवन करतात.

(Image Credit : solutionastrology.com)

हिंदू धर्मात होम-हवनाला सर्वात पवित्र धार्मिक कार्य मानलं जातं. लग्न असो वा कोणताही धार्मिक कार्यक्रम नेहमीच लोक होम-हवन करतात. होम-हवन करताना काही मंत्रांचा जप करून 'स्वाहा' म्हणून काही पदार्थ किंवा वस्तू अग्निमध्ये टाकल्या जातात. यात देवाला काही नैवेद्यही अर्पण केलं जातं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, प्रत्येक मंत्रांच्या शेवटी स्वाहा का म्हटलं जातं? अनेकदा तुम्हीही गंमतीने कधी स्वाहा म्हटलं असेल. चला जाणून घेऊ याचा अर्थ. 

श्रीमद्भगवत गीता आणि शिव पुराणात स्वाहाचं वर्णन आढळतं. स्वाहा चा अर्थ आहे योग्य पद्धतीने पोहोचवणे म्हणजे कोणतीही वस्तू त्याच्या प्रिय व्यक्तीपर्यंत सुरक्षित आणि योग्य पद्धतीने पोहोचवणे. पुराणांनुसार, 'स्वाहा' ही अग्नि देवाची पत्नी आहे. त्यामुळेच होम-हवनाच्या प्रत्येक मंत्रांनंतर या शब्दाचा उच्चार केला जातो. 

तसेच असेही मानले जाते की, कोणताही हवन हा तोपर्यंत सफल मानला जात नाही, जोपर्यंत देवता त्या हवनाला ग्रहण करत नाही. पण देवता हे ग्रहण तेव्हाच करतात जेव्हा अग्नि द्वारे आणि स्वाहाच्या माध्यमातून ते अर्पण केलं जात नाही. 

स्वाहाबाबत असेही म्हटले जाते की, स्वाहा ही प्रजापति दक्षची मुलगी होती. तिचा विवाह अग्नि देवासोबत झाला होता. अग्निदेव त्यांची पत्नी स्वाहाच्या माध्यमातूनच हविष्य ग्रहण करतात. 

स्वाहाशी निगडीत आणकी एका आख्यायिकेनुसार स्वाहा ही निसर्गाचीच एक कला होती. तिचा विवाह अग्निसोबत देवतांच्या आग्रहावरून संपन्न झाला होता. भगवान श्रीकृष्णाने स्वत: स्वाहाला हे वरदान दिला होतं की, केवळ तिच्याच माध्यमातून देवता हविष्य ग्रहण करू शकतील. त्यामुळेच कोणताही यज्ञ तेव्हा पूर्ण मानला जातो, जेव्हा आवाहन केल्या गेलेल्या देवताना त्यांच्या आवडीचा भोग पोहोचवला जातो. 

तसेच असेही सांगितले जाते की, हवनाचे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिकही लाभ आहेत. राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थेद्वारे करण्यात आलेल्या शोधानुसार, यज्ञ आणि हवनादरम्यान निघणाऱ्या धुरामुळे हवेत असलेले हानिकारक जीवाणू ९५ टक्क्यांपर्यत नष्ट होतात. सोबतच या धुराने वातावरण शुद्ध होतं, ज्यामुळे पसरणारे आजार होण्याचा धोकाही कमी असतो. 

टॅग्स :HinduismहिंदुइझमAdhyatmikआध्यात्मिक