शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
2
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
3
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
4
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
5
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
6
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
7
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
8
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
9
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
10
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
11
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
12
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
13
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
14
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
15
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
17
'X'वर अश्लील कंटेंट विरोधात अ‍ॅक्शन, ६०० अकाउंट डिलीट; मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर, इलॉन मस्क यांची कारवाई
18
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
19
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
20
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
Daily Top 2Weekly Top 5

सरळ... की डावीकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 06:42 IST

- धनंजय जोशी आपल्यापैकी जे गाडी चालवतात, त्यांना हे शब्द माहीत असतील - ‘बॅक सीट ड्राइव्हर’! म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारी ...

- धनंजय जोशीआपल्यापैकी जे गाडी चालवतात, त्यांना हे शब्द माहीत असतील - ‘बॅक सीट ड्राइव्हर’! म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला असतो तोच सगळे ड्रायव्हिंग करतो. इकडे जा, इकडे डावीकडे, इकडे उजवीकडे, इकडे सरळ.. माझ्या पत्नीने ही जबाबदारी अगदी उत्साहाने उचलली आहे. माझे झेन गुरु सान सा निम म्हणायचे, ‘सगळ्यात मोठा बॅक सीट ड्राइव्हर म्हणजे आपले मन! आपण आपले आयुष्य जगताना हा बॅक सीट ड्राइव्हर कायम काही ना काहीतरी सांगत राहातो.. हे करू नको, हे चांगले, हे वाईट, हे आवडले, हे नाही आवडले! आपल्या प्रत्येक क्रियेबाबत ह्या बॅक सीट ड्राइव्हरला आपले मत सांगायचे असते. झेन साधना म्हणजे ह्या बॅक सीट ड्राइव्हरला शांत करणे. ह्या बॅक सीट ड्राइव्हरची मते येतात तरी कुठून? त्याला सान सा निम म्हणायचे, ‘चेकिंग माइंड’ - म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपणच न्यायाधीश मानणारे मन! हा बॅक सीट ड्राइव्हर सगळीकडे आपल्या पाठीवर बसून आपल्याला न समजता आपले आयुष्य घडवत असतो. ह्याच्यापासून सुटका करून घेणे हे झेन साधनेचे काम !सान सा निम यांची एक आवडती शिकवण होती : ते म्हणायचे, ‘धनंजय, ओन्ली गो स्टेÑट! - फक्त सरळ जा!’ आता हे वाटते सोपे; पण आचरणात आणणे फार कठीण! त्याचा अर्थ तर समजायला पाहिजे! सरळ जाणे म्हणजे कोणतीही शंका न येता क्रिया करणे!सान सा निम यांना मी माझ्या गाडीमधून कुठे कुठे नेत असे. शिकागोमधले नसले तरी त्यांना सगळे रस्ते माहीत होते त्यामुळे त्यांच्यामधला बॅक सीट ड्राइव्हर चांगला उत्साही होता. असेच एकदा आम्ही त्यांच्या एका भक्ताकडे चाललो होतो. नेहमीप्रमाणे ‘इथे डावीकडे, इथे उजवीकडे’ चालले होते. एका सिग्नलला मला म्हणाले, ‘ओन्ली गो स्टेÑट!’ मी म्हणालो, ‘मला वाटते इथे डावीकडे वळायचे आहे!’ ते हसून म्हणाले, ‘अरे जेव्हा मी म्हणतो सरळ जा, त्याचा कधी कधी अर्थ म्हणजे डावीकडे जा!’- झेन गुरूंच्या शब्दांकडे वेगळंच लक्ष द्यायला लागतं!