शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचे डोही आनंद तरंग : चंद्रभागेच्या तीरावरून सुरू होते अंतरंग साधना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 11:34 IST

एका तत्त्ववेक्त्याने म्हटले होते, आचारा विचारांची पालखी, खऱ्या अर्थाने पसायदानाच्या पंढरपुरी गेली पाहिजे, त्यामुळे देवालाही समाधान वाटेल.

वारी हा अत्यंत निर्मळ स्वरूपाचा प्रवाह आहे. त्यात वषार्नुवर्षे सहभागी होणारे निष्ठावान वारकऱ्यांचे फड, त्यातील भजनाची दिव्य परंपरा ही रोमांचाचे रान उभे करणारी आहे. महाराष्ट्रातील सकल संतांनी आम्हाला वारी काय आहे, हे शिकविले आहे. संत-देव आणि भक्त असा भावभक्तीचा सोहळा अनुभवण्यास मिळतो. वारीत हा वेगळा भक्तिभाव दिसून येतो.खरे तर आपली जीवनाची वारी जाऊ नये, यासाठी संतसंगतीत वारी करणे गरजेचे आहे. संत तुकाराममहाराजांचे उद्गार आहेत,ते या पंढरीशी घडे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूच्या धारा, कोठे रोमांच शरीरा, तुका म्हणे कोठे वेचिला अभेद्याचा काला.. असा अद्वैताचा सोहळा आहे. पंढरी समीप असणाऱ्या वाखरीवर संतांच्या सर्व दिंड्या एकत्र येतात. तिथे महासमन्वय घडतो. संतांचा मेळा जमतो आणि पुढे पंढरीकडे वाटचाल होते. पुढे देवाचाही रथ पुढे येतो. संतांची आणि देवाची भेट होते. बघा, ही काय भावरम्यता आहे. वारकरी जेव्हा पंढरीत प्रवेश करतात त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू येतात. याविषयीचा एक सुंदर अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे. तुकोबांच्या अभंगानुसार, पावलो पंढरी, क्षमा लिंगणी, संत या सज्जनी निवविलो, पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला हा सखा मायबाप, पावलो पंढरी, आपुले माहेर, नाही संसार तुका म्हणे... अशा स्वरूपाचा एक कृतार्थतेचा भाव या सोहळ्यात असतो. खरे तर वारीत पोहोचले म्हणजे संपले नाही. तर चंद्रभागेस्नान, विधीवत हरिकथा आहे. हरिकथा श्रवण आणि चिंतनही केले जाते. येथूनच चंद्रभागातीरावरून अंतरंग साधना सुरू होते. वारीत एका झेंड्याखाली आपण सर्व जण एकत्र येतो. त्यातील भक्तिभाव आणि भावरम्यता ही अद्भुतच आणि अलौकिक आहे. या विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला... तेथं सुद्धा एका तत्त्ववेक्त्याने म्हटले होते, आचारा विचारांची पालखी, खऱ्या अर्थाने पसायदानाच्या पंढरपुरी गेली पाहिजे, त्यामुळे देवालाही समाधान वाटेल. खरे तर असा एक आधुनिक अर्थ आपण काढायला हरकत नाही. आज वारीत काळानुरूप बदल होत आहेत. स्वच्छतेच्या आरोग्याच्या अनुषंगाने चांगले काम होत आहे. वारकरी जीवनही सजग आणि जागे झालेले आहे. निर्मळवारी, पवित्र वारी असाही बदल होत आहे. हा बदल अमूलाग्र आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी