शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म - पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 05:32 IST

विवेकी पुरुष क्षण वाया जाऊ देत नाही. क्षणाची खरी किंमत धावपटूला विचारा तो सांगेल, फक्त एकाच क्षणात जय किंवा पराजय मिळत असतो.

 - बा. भो. शास्त्रीश्रीचक्रधर स्वामी म्हणतात, ‘‘जीव क्षणा एकामाजी ते एक आपजवी आपणयासी जे जन्माचा हस्त्री निस्तरो न सरे.’’ विवेकी पुरुष क्षण वाया जाऊ देत नाही. क्षणाची खरी किंमत धावपटूला विचारा तो सांगेल, फक्त एकाच क्षणात जय किंवा पराजय मिळत असतो. निडणुकीत एकाच मताने विजय किंवा पराजय होतो. जन्माचा क्षण आठवत नाही. मृत्यूचा क्षण आवडत नाही. मधला क्षण सापडत नाही. त्याच क्षणाचा विचार संत तुकोबा करायला सांगतात.‘क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू’एकच ठिणगी जंगलाला आग लावते. पण तेव्हाच तिच्यावर एकच पाण्याचा थेंब पडला तर ठिणगी विझते व जंगल वाचतं. प्रत्येकाच्या जीवनात चांगले क्षण येतात व जातात. थांबत नाहीत. परतही येत नाहीत. ते वेचावे लागतात. पचवावे लागतात. जगावे लागतात. कणाकणाने संघटित झालेल्या दगडाच्या पायावर इमारत उभी राहते. एकवटलेल्या निश्चल क्षणावर शाश्वत मुक्ती आपली वाट पाहत असते. ज्ञानेश्वरीत एक गोड ओवी आहे.‘‘ते एकवटूनी जियेक्षणीअनुसरलेगा माझिये वाहानीतेव्हाचि तयांची चिंतवनीमजची पडली’’स्वामींनी या सूत्रातून अखंड प्रेमाचा सल्ला दिला आहे. संसाराचा आरंभ चांगलाच आहे. पण शेवट करता आला पाहिजे. मंदिर बांधणं सोपं आहे. पण पावित्र्य टिकवणं महत्त्वाचं आहे. मी व्यसन सोडणार हा संकल्प चांगला, पण सिद्धीला नेता आला पाहिजे. सर्वांच्याच जीवनात चांगल्या सद्भावना कधी कधी निर्माण होतच असतात. त्यांना निश्चयाचं बळ नाही मिळालं तर त्या विरून जातात, मिळालं तर त्या मजबूत होतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक