...तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 03:02 AM2020-03-04T03:02:24+5:302020-03-04T03:02:30+5:30

तुम्ही जर तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्ची घातली, तर साहजिकच तुम्ही काही साध्य करू शकणार नाही.

The spirit of meditation | ...तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो

...तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो

Next

- सद्गुरू जग्गी वासुदेव
एकदा तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की तुम्ही त्याप्रति फक्त तीव्र इच्छा बाळगून भागणार नाही, तुम्ही झपाटलं पाहिजे. तुमच्यातील जीवन चैतन्याचं शिखर गाठायचं असेल, तर तुमच्यापाशी असलेली सर्व ऊर्जा एकाच दिशेने केंद्रित करणं आवश्यक
आहे. तुम्ही जर तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्ची घातली, तर साहजिकच तुम्ही काही साध्य करू शकणार नाही. म्हणूनच गुरू तुमची ती पोकळी गरजेनुसार भरून काढतात. पण तुम्हाला तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करायची असेल, तर ते व्यर्थ
ठरेल. म्हणून एकदा का तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की झपाटून जा. तुमच्यासाठी दुसरं काहीही नाही. इतर सर्वकाही तुम्हाला तेथे पोहोचविण्यासाठी आहे. जेव्हा असं होतं, तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो. तसं नसेल, अध्यात्म म्हणजे तुमच्यासाठी केवळ एक दुय्यम दर्जाचा छंद असेल, जणू एक प्रकारचं आध्यात्मिक मनोरंजन. कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन शोधत असतात आणि काही लोक आध्यात्मिक मनोरंजनात वेळ घालवतात. तरीसुद्धा हे तुमचं निवडस्वातंत्र्य आहे. परंतु तुम्हाला ज्ञानप्राप्तीची खरीखुरी आस असेल, तेव्हा तुमचं संपूर्ण अस्तित्व फक्त एकाच दिशेने, एकाग्रतेने समर्पित असणं आवश्यक आहे. तुम्ही त्याने पूर्णपणे झपाटलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात उचलत असलेलं प्रत्येक पाऊल, तुम्ही
करत असलेली प्रत्येक कृती, तुमचा प्रत्येक श्वास एक आध्यात्मिक प्रक्रिया बनते, तेव्हा आयुष्यात कोणताच संघर्ष उरणार नाही. जेव्हा तुम्ही असं म्हणता, हा माझा आध्यात्मिक मार्ग आहे, ते माझं कुटुंब आहे, तो माझा व्यवसाय आहे, तेव्हा संघर्ष निर्माण होतो. पण मी जे
खातो, ते केवळ सत्य जाणण्यासाठी, मी काही पितो, ते सत्याच्या शोधासाठी, मी जर काही कार्य करतो तर ते सत्य उमजण्यासाठी. असं असेल तर संघर्ष उद्भवणार नाही.

Web Title: The spirit of meditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.