शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून तू आता हे पापाचे बीजच नष्ट करून टाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:56 IST

हे अग्निदेवते, तू आम्हाला शुभ्र आणि सुंदर अशा मार्गाने त्या परम कल्याणरूप तेजोमय परमेश्वराकडे घेऊन जा.

- शैलजा शेवडेअग्ने नय सुपथा रायेअस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान।युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उिक्तं विधेम ॥ईशोपनिषदातील हा शेवटचा श्लोक. याचा अर्थ आहे, हे अग्निदेवते, तू आम्हाला शुभ्र आणि सुंदर अशा मार्गाने त्या परम कल्याणरूप तेजोमय परमेश्वराकडे घेऊन जा. वाकड्या मार्गाने नेणाऱ्या पापांशी यशपूर्वक झगडता येईल, इतके तू कर, इतकी शक्ती आम्हाला दे. तुला आमची सर्व कर्मे ठाऊक आहेत. आमचे हे भ्रमरूप पाप नाहीसे कर. स्वसरूपाविषयी अज्ञान, हेच मूळ पाप होय. म्हणजे आपण हे शरीर मन इ. आहोत, असे मानणे हे पाप. या अज्ञानातूच सर्व पापांची उत्पत्ती होते. म्हणून तू आता हे पापाचे बीजच नष्ट करून टाक. (स्वामी विवेकानंद म्हणतात की, वेदांतात अज्ञानालाच पाप म्हणले आहे.) तुला परत परत नम्रतेने प्रार्थना करत आहोत. हे विश्व जणू उभ्या आडव्या धाग्याने विणलेले वस्त्र आहे, अशी कल्पना करून साधक म्हणतात, हे धागेही तू आम्हाला उकलून दाखव. म्हणजे आम्हाला सर्व कर्माचे रहस्य समजेल, कर्माला कारणीभूत होणारी तत्त्वे कळतील, जीवनाची वाटचाल करत असताना चुकूनमाकून आमच्या हातून दुष्कर्म किंवा पाप होण्याचा संभाव दिसू लागला, तर ते दूर करण्यास आम्हाला सामर्थ्य दे. परमेश्वर मार्ग दाखवतोच... प्रेरणा देऊन योग्य मार्गाने जाण्यास प्रवृत्त करतो, पण केव्हा, तर साधक त्याला पूर्ण शरण गेल्यावरच म्हणून आपण नम्र भावाने प्रार्थना करायची.या श्लोकाचा मी केलेला काव्यानुवाद,अग्निदेवा, तुला ज्ञात आमुची सर्व कर्मे, ने परमात्म्याकडे प्रकाशमान पथाने, नष्ट कर आमुचे भ्रमरूप पाप, नमस्कारीतो तुला आम्ही परत परत।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक