शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - एकांताचा वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 02:15 IST

तनामनाच्या खूप खोल कोलाहलात गुरफटलेल्या आपल्या वृत्तीला कुठं ना कुठं थोडं शांततेचं स्थिरावणं असावं म्हणून आपण आपल्या भोवतालची अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो;

इंद्रजीत देशमुखतनामनाच्या खूप खोल कोलाहलात गुरफटलेल्या आपल्या वृत्तीला कुठं ना कुठं थोडं शांततेचं स्थिरावणं असावं म्हणून आपण आपल्या भोवतालची अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो; पण आपण शोधलेल्या आशा सर्वच ठिकाणी आपलं शांततेचं विसावणं होईल की नाही, हे मात्र सांगता येत नाही. आमच्या सदोष शोधपद्धतीचा सुगावा लागलेले तुकोबाराय आपल्याला अशा शांततेच्या विसावण्याबद्दल एके ठिकाणी सांगतात,

येणे सुखे रुचे एकांताचा वास।नाही गुणदोष अंगा येत।।’

वास्तविक, जीवनातील अनंत बाबींबद्दल अनंतजणांशी संवाद साधण्याच्या नादी लागून आपण आपल्या जीवनहित चिंतनासाठी कधीच स्वत:शी हितगूज केलं नाही. अशा स्वहित चिंतनहेतुक उद्देशाने आपल्या जीवनात एकांत खूप महत्त्वाचा आहे. आजच्या युगात सतत धावपळ असणाऱ्या आमच्या जीवनात एकांत व एकांताची आवड या खूप कमी प्रमाण असलेल्या बाबी आहेत. एकांतात आपल्याच हातून आपल्याच बाबतीत घडलेल्या कितीतरी चुकीच्या व बरोबर असणाºया गोष्टींचे अवलोकन करता येते. शिवाय एकांतात आपल्या स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव ठेवून उद्याच्या भविष्याचे नियोजनही करता येते. एकांतात आपणच आपले निरीक्षक असतो. त्यामुळे उद्याच्या चुकणाºया पावलाला बंधन घालण्यासाठीचे वैचारिक नियोजन या काळात करता येते. जगातील कितीतरी जणांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या थोर-मोठेपणाची प्रचिती आपण घेतो; पण एकांतात राहून स्वत:च स्वत:ला भेटून अंतरी दडलेल्या मोठेपणाची अनुभूती घेऊ शकतो. म्हणून तर जगाला भेटू वा न भेटू; पण आपल्या एकांत नित्यतेने आपण स्वत:च स्वत:ला मात्र नक्की भेटू.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकonlineऑनलाइन