शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

सूक्ष्माची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 3:31 AM

आत्मस्वरूप सूक्ष्म आहे, त्या सूक्ष्माचे भान सुटून देणारी कर्मं परमात्म्याला अर्पण करीत आपल्या मूळ आनंद स्वरूपाशी सुसंगत आचरण राखणारी ती आत्मबुद्धी.

- स.भ. मोहनबुवा रामदासीसमर्थांनी राघवाच्या स्वरूपाबद्दल असे म्हटले आहे की, नभासारीखे रूप या राघवाचे। मनी चिंतीता मूळतूटे भवाचे। राघव हा शब्द केवळ प्रभूरामचंद्रांच्या पुरता मर्यादित वापरलेला नसून अत्यंत व्यापकपणे राघव हा शब्द वापरला आहे. सर्व देवांच्या ठिकाणी समर्थांचा असणारा हा आदरभाव जाणून घेण्यासारखा आहे, ज्या भगवंतांचं स्वरूप अतिशय विशाल आहे. त्याला आकाशीचं सामर्थ्य उपमा देतात. पण त्या परमात्म्याची अनुभूती हा विषय अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्माची अनुभूती सूक्ष्मानेच घ्यावी लागते. आत्मस्वरूप सूक्ष्म आहे, त्या सूक्ष्माचे भान सुटून देणारी कर्मं परमात्म्याला अर्पण करीत आपल्या मूळ आनंद स्वरूपाशी सुसंगत आचरण राखणारी ती आत्मबुद्धी. अगदी थोडक्यात सांगायचे तर स्वार्थात चिकटलेली आणि स्वार्थासाठी धडपडणारी ती देहबुद्धी. मनही जसजसे आपल्या कह्यात येत जाते तसतशी ही आत्मबुद्धी प्रकाशमान होत जाते. स्वार्थ साधना साधण्यासाठी आजवर जी शक्ती वापरली व आजही वापरली जात आहे, तीच शक्ती स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, आत्मभान जागविण्यासाठी आणि नि:स्वार्थ होण्यासाठी वळविणे हे सर्वोत्तम होईल. मन जागृत झाले तर ते सहजशक्य होते. मन जागृत करण्यासाठी स्वत:तील विवेक जागवला पाहिजे. तो प्रयत्नपूर्वक जागवता येतो. विचारांच्या मागे धावण्यापेक्षा, विचारांना मागे टाकून त्यांना ओव्हरटेक करू देऊ नका. विचार आणि विकार यात फरक आहे. तो जाणीवपूर्वक लक्षात घेतला पाहिजे. विकार ही एक आसुरी शक्ती आहे, आसुरी शक्तीचे स्मरणसुद्धा होऊ नये यासाठी भगवंताचे स्मरण करायला सांगितले आहे. विकारांवर विजय मिळवायचा आहे हासुद्धा साधनेच्या वेळी संकल्प नसावा. कारण जो संकल्प म्हणून केला जातो त्याचे अंत:करणात स्मरण राहते. म्हणून विकारांचे स्मरण हेच खरे मरण असते. हे स्मरण होऊ देता कामा नये.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक