शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

। संतांचिया गावी... ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:23 AM

-इंद्रजित देशमुख‘आता जावे पंढरीशी।दंडवत विठोबाशी।।’असा अतिअगत्यदर्शी सात्त्विक भाव उरात धरून माउली आणि जगद्गुरू या दोन्ही संत महात्म्यांच्या पालखी सोहळ्यांनी वाखरीत विसावा घेतलाय. आज दिवसभर इथं थांबून संध्याकाळी हे दोन्ही सोहळे पंढरपुरात जाणार आहेत आणि हा वारकऱ्यांच्या प्रेमाने ओथंबलेला समुद्र त्या पंढरीश परमात्म्याच्या कृपासागरात मिसळणार आहे.‘देव आणि भक्त दुजा नाही विचार’ ...

-इंद्रजित देशमुख

‘आता जावे पंढरीशी।दंडवत विठोबाशी।।’असा अतिअगत्यदर्शी सात्त्विक भाव उरात धरून माउली आणि जगद्गुरू या दोन्ही संत महात्म्यांच्या पालखी सोहळ्यांनी वाखरीत विसावा घेतलाय. आज दिवसभर इथं थांबून संध्याकाळी हे दोन्ही सोहळे पंढरपुरात जाणार आहेत आणि हा वारकऱ्यांच्या प्रेमाने ओथंबलेला समुद्र त्या पंढरीश परमात्म्याच्या कृपासागरात मिसळणार आहे.‘देव आणि भक्त दुजा नाही विचार’ याचं प्रत्यंतर आम्हाला आज या संतांच्या गावात अनुभवायला मिळणार आहे. अंत:करणाला ओतप्रोत संपन्नता बहाल करणाºया संतांच्या गावाचं वर्णन माझे तुकोबाराय खूप छान शब्दांत करतात आणि म्हणतात,‘संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळ।नाही तळमळ दुखलेश।।तेथे मी राहीन होऊनि याचक।घालतील भीक तेचि मज।।संतांचिया गावी असे भांडवल।अवघा विठ्ठल धन वित्त।।संतांचिया गावी उपदेशाची पेठ।प्रेम सुख साट देती घेती।।तुका म्हणे तेथे आणिक नाही परी।म्हणुनी भिकारी झालो त्यांचा।।संतांनी निर्माण केलेल्या या गावात प्रेमाचाच सुकाळ आहे. दु:खाचा लेशही नाही असं तुकोबारायांचं मत आहे. कारण दु:खाची निर्मिती ही भेदातून होत आहे. संतांच्या गावात भेदच असत नाहीत मग दु:ख असेलच कसे.मुळात संतांचे खूप विलक्षण असणारे चार गुण आहेत. ते म्हणजे मित्रता, करुणा, शांतता आणि आचरण. संत सर्वजिव्य मित्रता धारण करतात. विश्वातील प्रत्येक जिवाशी त्यांनी मित्रता धारण केलेली असते. ‘कोण्याही जिवाचा न घडो मत्सर’ हे त्या सर्वेश्वर परमात्म्याच्या पूजेचे वर्म त्यांनी अंतयार्मी जपलेले असते. म्हणूनच सर्व जिवाशी ते मित्रतेने वागतात. माझ्या तुकोबारायांनी आपल्याला पाहून बुजून उडून गेलेली पाखरं पाहिली आणि अंतर्मुख होऊन स्वत:ची साधना वाढवली. माझ्या नाथांनी काशीहून आणलेली पाण्याची कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखात ओतली. माझे नामदेवराय तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या पाठीमागून धावले. ही सगळी त्या मित्रतेच्या गुणांची वस्तुनीती दाखवून देणारी उदाहरणे आहेत.जणी वणी अवघा देव।या अनुवृत्तीत ते जगत असतात.संतांच्या करूणेबद्दल काय बोलावं, त्यांच्या हृदयात सदैव आणि सर्वांसाठीच कारुण्यभाव ओथंबलेला असतो. म्हणून तर ज्या जगाने दगड मारले, झोळीत शेण घातलं त्याच जगासाठी माझी माउली पसायदान मागते. याच जगावर आनंदाचे आवारू मांडण्याची प्रतिज्ञा करते आहे.संतांच्या अंगी आणखीन एक महत्त्वाचा आणि विलक्षण गुण असतो आणि तो म्हणजे शांतता. संत कायमच संतुलित वृत्तीने जगत असतात. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या जीवनात ज्या परमशांतीचा अनुनय केलेला असतो त्यापासून ते कधीच परावृत्त होत नाहीत आणि म्हणूनच माझ्या गोरोबाकाकांनी स्वत:च्या पायाखाली तुडवलं तरी कबिरांनी स्वत:चं मुल संतांचिया पायी खर्च केलं तरी ते शांत होते.‘सुखी संतोशा न यावे।दु:खी विशादा न भजावे’।असं ते जगत असतात.संतांच्या अंगचा सगळ्यात महत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे आचरण होय. आचरणाच्या बाबतीत ते अगोदर वागतात आणि मग सांगतात 'बोले तैसा चाले’ हे समृद्ध विचार तुकयांच्यासाठीच असतं. उक्ती आणि कृती यात अगदी तसूभरही फरक ते ठेवत नाहीत.या आणि अशा अनंत गुणांनी मंडित असलेलं जगणं संतांनी अंगिकारलेलं असतं म्हणूनच तिथे प्रेमाचा सुकाळ असतो. अशांच्या दारात याचक होऊन रहावं आणि आपली सर्व अंगांनी अपूर्ण असणारी झोळी भरून घ्यावी. कारण जिथे विठ्ठल नामच धन व वित्त म्हणून कार्यरत असतं. उपदेशाची अगदी पेठच असते आणि त्यात प्रेम व सुख भरलेलं असतं. त्यांच्याइतकं तुलनेत दुसरं कुठंच आणि काहीच मिळत नाही म्हणून महाराज म्हणतात की, 'मी इथे भिकारी का झालो त्याचं कारण याचकाला पूर्णांशाने तृप्त करणारं एकमेव गाव म्हणजे हे संतांचं गाव होय’. आज या गावात हे सगळे संतजन आलेत, त्याच्या वर्णनासाठी महाराज म्हणतात,या सगळ्याच संतांच्या मांदियाळीत रमून आम्ही आमच्यातील आमचंपण हरवून त्यांच्यासारखंच बनावं आणि ही ज्ञानोबा-तुकोबांची वारी आमच्या आत उतरावी, अशी याचना करत म्हणावसं वाटतंय‘गोमटेसे करा माझे।भार ओझे तुम्हांसी।।’(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)