शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

समृध्द जीवनासाठी संतविचार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:01 IST

मानवी जीवनाची उंची वाढविणे पसायदान हे आहे...

- हभप चंद्रकांत महाराज वांजळे, (प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार) वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून विश्वसुखाची प्रार्थना केली आहे. आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे . माऊलींचे पसायदान ही विश्वप्रार्थना आहे. माऊली जी विश्वप्रार्थना करताहेत, त्यात विश्वात्मक सुखाचे मागणे आहे. ते मिळाल्यानंतर त्यांचे असणारे विश्वात्मक गुरूं म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो..पसायदानात मागितलेले तुझे सगळे पूर्ण होईल. तेव्हा येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाहला... जग सुखी झाले की ज्ञानोबा सुखी झाले. माऊलींना मला द्या म्हटलय पण, मज द्या म्हणताना, मला व्यक्तिगत नाही तर सगळ्या जगासाठी मागितलेले आहे. म्हणून ती विश्वप्रार्थना आहे. भविष्यात जगातील सर्व देश आणि संस्कृती एकत्र आल्या आणि सर्वांचे एक विश्वगीत जर कोणते असेल तर महाराष्ट्रातील ज्ञानोबारायांचे पसायदान हेच गावे लागणार आहे. मानवी जीवनाची उंची वाढविणे पसायदान हे आहे. संतांनी मानवी जीवन उदात्त आणि समृद्ध होण्यासाठी खूप खस्ता घेतलेल्या आहेत. ती कृतज्ञता संतश्रेष्ठ तुकोबारायांनी व्यक्त केली आहे. देऊनिया जीव, वढयेला साधियेला ठाव... हे सगळं करताना, हे सोपे काम नव्हते. कुणीतरी माऊलींचे चरित्र लिहिताना म्हटले होते. माय जॉय इज माय पब्लिक प्रॉपर्टी, बीटवीन मेन अ?ँड मी. माय पेन इज माय प्रायवेट प्रॉपर्टी.. माझा आनंद ही माझी सार्वजनिक मालमत्ता आहे.   ती लोकांना वाटण्यासाठी आहे. माझे दु:ख ही माझी प्रायवेट प्रॉपर्टी आहे. ती माज्यासाठी आहे. किती हा उदात्त विचार आहे. खरे तर आनंदाची उधळण करणारे महात्मे, संत याच मातीत वाढले, मोठे झाले. आकाशाऐवढे मोठे झाले. ह्यह्यअणु रेणूया थोकडा, तुका आकाशाएवढा... तुकोबारायांनी ४१ वर्षांच्या आयुष्यात एवढी क्रांती केली. माऊलींचे आयुष्यही वीस एकवीस वर्षांचे. सर्वसामान्य माणसांना मिळालेल्या आयुष्यात काही दीव्य करता येत नाही. मात्र, संत महात्मे हे जीवनासाठी प्रेरक असतात. त्यांच्या विचार-आचारातून आपणास चेतना मिळत असते. अशा संतांना लोकोत्तर जीवन जगता येते, त्यामुळे संतांचे विचार, संतसाहित्याचे वाचन आपण करायला हवे. त्यातून समृद्ध जीवन जगता येणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर