शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचे डोही आनंद तरंग- ‘पुण्य उभे राहू आता, संताचीया कारणे...’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 13:24 IST

पंढरीची वारीची वाट नुसती, भूगोलाची किंवा जमिनीवरची वाट नसून भक्तीची वाट आहे...

- हभप.चंद्रकांतमहाराज वांजळे - (प्रसिध्द प्रवचन व कीर्तनकार ) वारीच्या वाटेवर पावले पडण्यासाठी फार मोठी पुण्याई आपल्या ठायी असावे लागते. वारीत भक्तीचा सागर तर असतोच, त्याचबरोबर आत्मशोध घेण्याचा आणि भावभक्तीचाही हा नयनरम्य असा दिव्य सोहळा असतो. जगद्गुरू संत तुकाराममहाराजांचा एक अभंग आहे, ‘पुण्य उभे राहू आता, संताचीया कारणे...’’ संतांचे पुण्य आपल्या पाठीमागे उभे रहो, कशासाठी? तर ‘‘पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटा विठ्ठल, संकल्प ते यावे फळा, कळवळा बहुतांचा, तुका म्हणे होऊनी क्षमा पुरुषोत्तमा अपराध’’ खरे तर संतांचे संकल्प जग कल्याणाचे आहेत. ज्यांना पुढे जाणे शक्य होणार नाही. त्यांना घरबसल्याही वारी होत असते.  त्यातूनही काही अपराधी जीव असेही असतील की त्याविषयी भगवंतांनी त्यास क्षमा करावी, असे तुकोबाराय म्हणतात. पंढरीची वारीची वाट नुसती, भूगोलाची किंवा जमिनीवरची वाट नसून भक्तीची वाट आहे. संत तुकोबारायांचा याविषयीचा एक अभंग आहे. ‘शीतळ हा पंथ, माहेराची वाट...’ माहेराची वाट शीतळ आहे. अशी तुकोबारायांनी या वारीच्या वाटेची भावरम्यता सांगितली आहे. अन्य वाटा तापलेल्या आहेत. दु:खाच्या किंवा वेदनांच्या आहेत अन्य वाटा माणसाला अध:पतनास नेणाऱ्या आहेत. त्या वाटांवर काटे-कुटे आहेत. मात्र, वारीची वाट ही शीतळ आहे. कारण ती भक्तीची आणि संतांबरोबर जाण्याची आहे. संत तुकाराममहाराज म्हणतात, ‘‘उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, तुका म्हणे तुम्ही चालू याची वाटे, भेटे पांडुरंग...’’ ज्या वाटेने पांडुरंगाची भेट आहे, अशी ही वारीची वाट आहे. खरे तर आज वाट दाखविणारे कमी आणि वाट लावणारेच अधिक आहेत. संतांच्या मागे जाऊन, संतांच्या संगतीत वारी करणे यासारखे दुसरे सुख नाही. वारीची खरी दीक्षा आहे. वारीमध्ये, दीक्षा, शिक्षा आणि भिक्षा ही आहे. वारीत दीक्षा आहे, ती तुळशीच्या माळेची. तर भिक्षा आहे, ती प्रेमाची आहे. ‘गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठले...’ ही दीक्षा आहे. नामाची दीक्षा आहे. आणि शिक्षा म्हणजे मारहाण नव्हे. तर शिक्षण या अर्थाने आहे. शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास समाज जीवनाशी बोलावे कसे? सामुदायिक वातावरण ठेवावे कसे? भेदाभेद विसरून एकत्र रहावे कसे? ही शिक्षा आहे, हे शिक्षण आहे. समाजभान हे पंढरीची वारी देत असते. 

टॅग्स :Puneपुणेsant tukaramसंत तुकारामPandharpur Wariपंढरपूर वारी