शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

... तर 'तुम्ही संसार जिंकला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 12:19 IST

एकीकडे आई-वडिलांचं ‘मन’ही द्वंद्व अवस्थेत राहते. शेवटी मुलाजवळ जावे तरी सुनेचे बोलणे सहन होत नाही. ती त्यांना स्वीकारतच नाही.

आई-वडील लहानपणापासून मुलांना प्रेम लावतात. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांचे लाड पुरवितात. मुलगा मोठा होतो. प्रेमविवाह करतो. त्याची पत्नी त्याला आई-वडिलांपासून दूर ठेवते. मुलगा आनंदात राहतो. आई-वडील कुढत बसतात. त्या दोघांनाही या मुलाच्या कर्तव्यशून्यतेचा खूप राग येतो. त्याच्या धास्तीने आई मानसिक आजारी होते. अशा परिस्थितीत तिला लकवा होतो. वडील तिची पूर्णरीत्या सेवा करतात. कारण ती धर्मपत्नी असते. रोज तिला स्वयंपाक स्वत: करून खावू घालतात. मुलाला मुलगी होते. तिला असे वाटते माझी नात मी एकदातरी बघावी. पण तसा प्रसंग सून येऊ देत नाही. त्यांना टाकून बोलते. नवरा अनेकवेळेला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण ती समजून घेत नाही. आई-वडिलांची दुरवस्था पाहून मुलगा चिडतो. त्याची घरात चीड चीड वाढते. कारण तो एकुलता एकच असतो. त्या मुलाची इकडे आड, तिकडे विहीर अशी मनोवस्था होते. एकीकडे आई-वडील, तर दुसरीकडे पत्नी या द्वंद्व अवस्थेत तो अडकतो. त्याचे ‘मन’ स्थिर नसते. रात्रंदिवस त्याच्या मनाची अवस्था बदलत राहते.

एकीकडे आई-वडिलांचं ‘मन’ही द्वंद्व अवस्थेत राहते. शेवटी मुलाजवळ जावे तरी सुनेचे बोलणे सहन होत नाही. ती त्यांना स्वीकारतच नाही. दोघेही नवरा-बायको आपल्या मुलाविषयी विचारात राहतात. शारीरिक त्रास - मानसिक त्रास या अवस्थेत मनाचे खंगलेपण, मनाची निराशा कधीतरी वाईट गोष्टींकडे धाव घेते. आत्मविश्वास हरवून बसलेले असतात. लहानपणापासूनच्या आठवणी सतावतात. मनाचे मनपण हरवलेले असते. फक्त निराशानेच जगायचे. आत्मानंद नाही. हरवलेले मन - पुन्हा कधीतरी जुनीपुराणी आठवण काढून जागे होते. कधीतरी मनाला वाटते. हे जीवन दिले नसते तर बरे झाले असते. ही अशी संतती देण्यापेक्षा वांझ ठेवले असतेस तर बरे झाले असते. मनाची अवस्था कालमानानुसार बदलत जाते. मनाला समजावणे एवढे सोपे काम नाही. मनोवस्था समयानुसार बदलते. त्यामुळे मनाला अगोदरच समजावा. संसार दु:खमूळ आहे. या दु:खमूळ संसारात राहून मनाला प्रसन्न ठेवणे जमले की तुम्ही संसार जिंकला.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकNashikनाशिक