शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मनाची निवृत्ती ही विवेक, वैराग्य इत्यादींनीयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 10:40 IST

मनाची निवृत्ती 

मन हे एक असे महत्त्वाचे आहे की, प्रगती व अधोगती ही दोन्हीही त्याच्यावर अवलंबून आहे़ मनाच्या ठिकाणी निर्माण होणाºया विकारांमुळे जीवन अधोगतीला जाते आहे़ या अधोगतीतून बाहेर निघायचे असेल तर मनाला संतसंगाची गोडी लागायला पाहिजे़ याकरिता मनाने त्याची संसारिक प्रवृत्तीची आसक्ती कमी करून निवृत्तीचा स्वीकार करावा लागेल. मनाची निवृत्ती ही विवेक, वैराग्य इत्यादींनीयुक्त आहे़ विवेक आला की माणसाच्या जीवनातील अनेक प्रश्न संपून जातात़ संसाररूपी रोगावर ‘विचार’ हेच महाऔषध आहे़ शास्त्रकारांनी तीन गोष्टी सांगितल्या आहेत़ *  काही गोष्टींचा कधीच विचार     करू नका*  काही गोष्टींचा थोडा विचार करा* काही गोष्टींचा नेहमी विचार करासंसारिक गोष्टीचा कधीच विचार करू नका की ज्या निष्फळ आहेत़ संगती, प्रगती, संपत्ती, संततीचा थोडा विचार करा व ‘मी कोण आहे?’ अशा तत्त्वाचा नेहमी विचार करावा़मी कोण ऐसा करावा विचार।म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।अशा तत्त्वविचाराने माणूस या दु:खरूपी संसारातून बाहेर पडेल, अन्यथा अखंड दु:ख भोगावे लागेल़ माणसाला जीवनातील सार काय व असार काय हे समजले पाहिजे़ संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात...त्रिगुण असार निर्गुण हे सा।सारासार विचार हरिपाठ।।अशा या सारासार विचाराने निर्माण झालेले वैराग्य हे खरे वैराग्य होय़ वैराग्याच्या गोष्टी बोलणे सोपे असते, पण अंगी आणणे कठीण असते़ विवेक, वैराग्य, इंद्रीयनिग्रह या सर्वांचा परिणाम म्हणजे वृत्ती, ही निवृत्ती होणे म्हणजे वृत्तीच्या ठिकाणी असलेली चंचलता निघून जाणे, वृत्तीची स्थिरता ही एकप्रकारची निवृत्तीच आहे़ ही निवृत्तीच या जीवाला निजबोधापर्यंत पोहोच करते़ मनाच्याच ठिकाणी प्रवृत्तीपासून निर्माण झालेला मोह आहे, तर याच मनाच्या ठिकाणी निवृत्तीपासून निर्माण झालेला निजबोध आहे़मोह हा या जीवाला सतत भुलविण्याचे काम करतो़ संत तुकाराम महाराज म्हणतात ना...विषय ओढी भुलले जीव!ही मोहाने निर्माण केलेली जीवाची विचिन्ह अवस्था आहे, तर याच मनाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या निजबोध हा या जीवाला ‘उन्मनी’ या अवस्थेपर्यंत घेऊन जातो़ तो कसा? याचा विचार पुढे करू!- ह.भ.प. जयवंत महाराज बोधलेधामणगावकर (पंढरपूर)

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीAdhyatmikआध्यात्मिक